Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...
Supriya Pilgaonkar : चिन्मयच्या लेकाला सुप्रिया पिळगांवकरांनी दिले अनेकानेक आशीर्वाद, पोस्ट करत म्हणाल्या, 'जहांगीर मांडलेकर...!'
अभिनेता चिन्मय मांडलेकरला (Chinmay Mandlekar) झालेल्या ट्रोलिंगनंतर अनेक कलाकार मंडळी चिन्मयच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिलीत. जहांगीरच्या ट्रोलिंगनंतर चिन्मयने महाराजांची भूमिका कायमची सोडण्याचा निर्णय घेतला. यावर कलासृष्टीसह अनेकांनी चिन्मयला हा त्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यावर आता अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांनी देखील पोस्ट केली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Mahesh Manjarekar : क्रिएटीव्हली क्रिटीसाईज करा, पण आई, बायको,मुलीवरुन बोलाल तर शोधून काढून कानफटवेन; महेश मांजरेकरांचा ट्रोलर्सला सज्जड दम
महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित 'जुनं फर्निचर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने महेश मांजेकरसह संपूर्ण जुनं फर्निचरच्या टीमने 'एबीपी माझाला' मुलाखत दिली. यावर महेश मांजरेकर यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. त्यातच त्यांनी ट्रोलिंग या मुद्द्यावरही त्यांचं स्पष्ट मत मांडलं.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Kshitee Jog : बाईला पैसे आणि धंदा नक्की कळतो का? क्षिती जोग स्पष्टच म्हणाली, 'बाई कटकट करते पण...'
अभिनेत्री क्षिती जोग (Kshitee Jog) हीने नुकतच मंगळसूत्रावरुन मांडलेल्या तिच्या मतामुळे चांगलीच चर्चेत आली होती. क्षितीने नुकतच मुग्धा गोडबोले रानडेला (Mugdha Godbole Ranade) दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. सध्या क्षितीच्या या वक्तव्यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. आता पुन्हा एकदा क्षितीच्या एका वक्तव्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Pushkar Shotri on Chinmay Mandlekar : जहांगीर नाव ठेवलं म्हणून वेगळे संस्कार करतोय का? चिन्मयला झालेल्या ट्रोलिंगनंतर पुष्कर श्रोत्रीचा परखड सवाल
मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यानंतर अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) बराच ट्रोल झाला आहे. त्यानंतर त्याने महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. यावर अनेक कलाकार मंडळींनी त्याला पाठिंबा देत त्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. आता यावर अभिनेता पुष्कर श्रोत्रीची (Pushkar Shotri) देखील प्रतिक्रिया समोर आली आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा
Ranveer Singh Deepfake Case : रणवीर सिंह डीपफेक प्रकरण, सायबर पोलिसांत गुन्हा दाखल; वडिलांनी केली होती तक्रार
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) हा 14 एप्रिल रोजी एका फॅशन शोमध्ये सहभागी होण्यासाठी वारणासीला गेला होता. यावेळी त्याने काशी विश्वेश्वराचं देखील दर्शन घेतलं होतं. त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेननदेखील होती. पण या वाराणसी भेटीनंतर अभिनेता रणवीर सिंह चांगलाच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. वाराणसीमध्ये एका वृत्तवाहिनी दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्याचा एक डीपफेक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा