Supriya Pilgaonkar On Chinmay Mandlekar : अभिनेता चिन्मय मांडलेकरला (Chinmay Mandlekar) झालेल्या ट्रोलिंगनंतर अनेक कलाकार मंडळी चिन्मयच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहिलीत. जहांगीरच्या ट्रोलिंगनंतर चिन्मयने महाराजांची भूमिका कायमची सोडण्याचा निर्णय घेतला. यावर कलासृष्टीसह अनेकांनी चिन्मयला हा त्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. त्यावर आता अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर (Supriya Pilgaonkar) यांनी देखील पोस्ट केली आहे.
मुलाचं नाव जहांगीर ठेवता आणि महाराजांची भूमिका करता अशा प्रकारचं ट्रोलिंग चिन्मयला करण्यात आलं. इतकचं नव्हे तर त्यांना आफगणिस्तान किंवा पाकिस्तानात जाऊन राहण्याचा देखील सल्ला दिला गेलाय. त्यामुळे यावर चिन्मयने आणि त्याच्या बायकोने एक व्हिडिओ शेअर करत या सगळ्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
सुप्रिया पिळगांवकरांनी काय म्हटलं?
सुप्रिया पिळगांवकरांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत यावर भाष्य केलं आहे. अगदी मोजक्या शब्दांत चिन्मयला ट्रोल करणाऱ्यांना सुप्रिया सुळेंनी चोख उत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, 'जहांगीर मांडेलकर तुला अनेकानेक शुभ आशीर्वाद!' सुप्रिया सुळेंच्या या पोस्टची सध्या चर्चा सुरु आहे.
म्हणून वेगळे संस्कार करतोय का? - पुष्कर श्रोत्री
पुष्कर श्रोत्रीने देखील माध्यमांशी संवाद साधताना या सगळ्यावर भाष्य केलं आहे. त्याने म्हटलं की, त्याने मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून वेगळे संस्कार करतोय का? तो भारतीय संस्कारच त्याच्यावर करतोय. आजची परिस्थिती कशी आहे याचा सगळा विचार करूनच तो त्याचं संगोपन करतोय. त्याला वाईट गोष्टीपासून परावृत्त करतोय, त्याला चांगल्याच गोष्टी शिकवतोय. मग, नावाने काय फरक पडतो? तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या मुलाच्या नावावरून त्याला ट्रोल करणार असाल, तर तुम्हाला इतिहास माहितीये का? ‘जहांगीर’ हे नाव का ठेवलं हे त्याने फार आधीच सांगितलेलं आहे. तुम्ही इतिहास चाचपडून बघा आणि तुमच्यामध्ये खरंच हिंमत असेल, तर तुमचा खरा चेहरा घेऊन समोर या. तुम्ही खोटी नावं, खोटी अकाऊंट्स बनवून ट्रोल करणार…तुम्हाला आम्ही किती महत्त्व द्यायचं? असे सवाल उपस्थित करत पुष्करने त्याचं परखड मत मांडलं आहे.
ही बातमी वाचा :
Kshitee Jog : बाईला पैसे आणि धंदा नक्की कळतो का? क्षिती जोग स्पष्टच म्हणाली, 'बाई कटकट करते पण...'