Telly Masala : मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial), चित्रपट (Movies) आणि वेब सीरिज (Web Series) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठीसह विविध कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या..
Bigg Boss Marathi Season 5 Updates : 'बिग बॉस मराठी'च्या घरात पहिल्याच दिवशी राडा, वर्षा उसगांवकरांवर घरातील सदस्य नाराज; काय झालं नेमकं?
'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi New Season) नवा सीझन सुरू झाला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) पहिल्याच दिवशी बिग बॉसने यंदाचा सीझन कसा असणार याची चुणूक दाखवली आहे. तर, दुसरीकडे आता बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांच्यावर मॉडेल निक्की तांबोळी आणि इतर सदस्यही नाराज झाले असल्याचे दिसून आले.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Premachi Goshta : मिहिका-हर्षवर्धनचं लग्न, सावनीचा जळफळाट; मुक्ता आणि सागर आता काय करणार?
स्टार प्रवाहवरील (Star Pravah) 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका सध्या बऱ्याच रंजक वळणावर आहे. सावनी आणि हर्षवर्धनच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच एक मोठा ट्विस्ट सध्या मालिकेत आला आहे. कारण हर्षवर्धनने मुक्ताची बहिण माहिकीसोबत लग्न केलंय. याचा मुक्ता, सागर आणि मिहिरला चांगलाच धक्का बसलाय.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Ketaki Chitale On Uran Case : ना पोलीस...ना प्रशासन...आपल्याला आता धर्मासाठी लढायचं आहे; केतकी चितळेचा यशश्री प्रकरणावर संताप
नवी मुंबईतील उरणमधील यशश्री शिंदे (Yashashri Shinde) या 22 वर्षीय तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. त्यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला होता. यशश्री शिंदे प्रकरणाचा छडा लावून दोषीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. तर, दुसरीकडे भाजप नेत्यांनी या प्रकरणात लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला आहे. यशश्री शिंदे प्रकरणावर अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) संताप व्यक्त केला असून आता आपल्याला धर्मासाठी लढायचे असून पोलीस आपल्या बाजूने नसल्याचे वक्तव्य केतकी चितळेने व्यक्त केले आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Bigg Boss Marathi Season 5 Suraj Chavan : गरिबानं मोठं व्हायचंच नाही का? सूरजचं 'गुलिगत' ट्रोलिंग करणाऱ्यांना नेटकऱ्यांनी झोड झोड झोडलं
छोट्या पडद्यावरील बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi Season 5) या रिएल्टी शोचा रविवारी थाटात ग्रँड प्रीमियर पार पडला. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमधील 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला आहे. त्यानंतर या स्पर्धकांवरुन ट्रोलिंगही सुरू झाले आहे. आपल्या खास शैलीने व्हिडीओ क्रिएट करणारा सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर सूरज चव्हाणच्या एन्ट्रीने अनेकांना धक्का बसला. सूरजच्या समावेशामुळे त्याच्यावर टीका करणाऱ्यांना, ट्रोलिंग करणाऱ्यांना नेटकऱ्यांनी झापलं आहे.
सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...
Shweta Pendase : श्वेता पेंडसेचं 'अ परफेक्ट मर्डर'मध्ये पुन्हा एन्ट्री, नाटकाच्या कथेला मिळणार नवी कलाटणी
गेली अनेक वर्ष नाट्यरसिकांचं मनोरंजन करीत ‘अ परफेक्ट मर्डर’ (A Perfect Murder) नाटकाने आपली घोडदौड सुरु ठेवली आहे. खून लपवण्याचा आणि खुनामागचं खरं रहस्य उलगडण्याचा खेळ म्हणजे ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक. अनेक नावाजलेल्या कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. नाटकाला वेगळा ट्विस्ट देण्यासाठी अभिनेत्री श्वेता पेंडसे लेडी इन्स्पेक्टर म्हणून समोर येणार आहे. या वेगळ्या भूमिकेद्वारे ती या नाटकात पुनरागमन करत आहे.