Bigg Boss Marathi Season 5 Updates : 'बिग बॉस मराठी'चा (Bigg Boss Marathi New Season) नवा सीझन सुरू झाला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या सीझनमध्ये (Bigg Boss Marathi Season 5) पहिल्याच दिवशी बिग बॉसने यंदाचा सीझन कसा असणार याची चुणूक दाखवली आहे. तर, दुसरीकडे आता बिग बॉसच्या घरातील सदस्यांमध्ये वादाची ठिणगी पडण्यास सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar) यांच्यावर  मॉडेल निक्की तांबोळी आणि इतर सदस्यही नाराज झाले असल्याचे दिसून आले. 


'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन सुरू झाला असून यंदा घरात 16 महारथी दाखल झाले आहेत. 'बिग बॉस मराठी'च्या घरात एकीकडे सदस्यांना पाणी नसणं, नाश्ता न मिळणं या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे पहिल्याच दिवशी घरातील सदस्यांची चांगलीच चिडचिड झाली. त्यामुळे पहिल्याच दिवसापासून सदस्याचे खरं रुप समोर येण्यास सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ  अभिनेत्री वर्षा उसगांवकर आणि आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात पहिल्या दिवशीच 'तू तू मै मै' झाले आहे. 


काय झालं नेमकं?


'बिग बॉस मराठी'च्या पहिल्याच दिवशी भागात वर्षा उसगावंकर या  मेकअप असतात. त्याच वेळी निक्कीही वर्षा उसगावंकर यांना हॉलमध्ये बोलवण्यासाठी येते आणि  "तुम्ही कृपया नंतर मेकअप करा, आधी हॉलमध्ये या'' असे म्हणते. त्यावर वर्षा ताई निक्कीला म्हणतात,"मला थोडं तयार व्हायलाच पाहिजे... तू व्यवस्थित तयार झालीस". पुढे निक्की वर्षाताईंना म्हणते,"लिपस्टिक नंतर लावा..आधी बाहेर येऊन बसा..लिपस्टिक कोणी नाही पाहत तसंही..." असेही निक्की म्हणते.






घरातील सर्व सदस्य एकत्र जमल्यावर 'बिग बॉस' आदेश देणार आहेत. त्यांच्या आदेशाची सर्व सदस्य आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, वर्षा उसगांवकर या घरातून बाहेर येत नसल्याने घरातील सदस्य हे नाराजी व्यक्त करतात. सर्व सदस्य बेडरुमध्ये मेकअप करणाऱ्या वर्षा उसगांवकर यांना बोलवताना दिसत आहेत. तुमच्यामुळे 'बिग बॉस'देखील थांबलेत असं घरातील इतर सदस्य वर्षांना सांगण्याचा प्रयत्न करतात.पण, वर्षा उसगावंकर या आपल्या मेकअपमध्ये मश्गुल असल्याचे दिसून आले. 


वर्षा उसगावकर यांनी केलेल्या उशीरमुळे घरातील सदस्यांची प्रतिक्रिया काय असणार? पहिल्या दिवशी हॉलमध्ये एकत्र येण्यास उशीर केल्याने वर्षा उसगावकर यांना बिग बॉस काही बोलणार का, शिक्षा देणार का, याकडेही प्रेक्षकांचे लक्ष असणार आहे.