Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ'(Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. नेहाने प्रेमाची कबुली दिली असली तरी यश-नेहाला एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे. तसेच यश-नेहा सतत चॅटिंग करत असल्याने नेहाचे परीकडे दुर्लक्ष होत आहे.
नेहाचे परीकडे दुर्लक्ष होत असल्याचे नेहा यशला बोलून दाखवते. यशलादेखील ते पटते. त्यामुळे ते एकमेकांसोबत कमीत-कमी बोलण्याचे ठरवतात. पण त्या दोघांनाही एकमेकांशिवाय न बोलता करमत नाही. त्यामुळे यश दुधवाला बनुन नेहाला भेटण्याचे ठरवतो.
यश दुधवाला बनुन नेहाला भेटण्यासाठी तिच्या घरी आल्याने नेहा खूश होते. श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.
संबंधित बातम्या
Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर साजरा झाला महिला दिन विशेष खास कार्यक्रम
Baipan Bhari Deva : तुमच्या आमच्या घरातल्या सुपरवूमनची गोष्ट, केदार शिंदेंनी केली 'बाईपण भारी देवा' सिनेमाची घोषणा
Ananya: आता महिला जे ठरवतील ते करुन दाखवतील, कारण 'अनन्या' येतेय; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha