Indian Idol Marathi : 'इंडियन आयडॉल मराठी' (Indian Idol Marathi) हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने 'इंडियन आयडॉल मराठी'च्या मंचावर एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 


स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धक मुलांनी खास सेटवरील महिलांसाठी स्वत:च्या हाताने केक बनवला होता. 'जागतिक महिला दिना'निमित्त 'इंडियन आयडॉल मराठी' च्या मंचावर समस्त महिलांकडून हा खास केक कापण्यात आला. दरम्यान निवेदिका पल्लवी जोशी आणि स्वानंदी टिकेकरदेखील उपस्थित होत्या.





'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम छोट्या पडद्यावर सुरू झाला असून सोशल मीडियावरदेखील या कार्यक्रमाची प्रचंड चर्चा होत आहे. प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला अल्पावधीतच आपलंस केलं आहे. इंडियन आयडल हा कार्यक्रम पहिल्यांदाच प्रादेशिक भाषेत होतो आहे. या कार्यक्रमाचे परीक्षक अजय-अतुल  असल्याने कार्यक्रमाची रंगत  वाढते आहे. सर्वोत्तम 14 स्पर्धकांमधून महाराष्ट्राला 'इंडियन आयडल मराठी'चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे. 


संबंधित बातम्या


Baipan Bhari Deva : तुमच्या आमच्या घरातल्या सुपरवूमनची गोष्ट, केदार शिंदेंनी केली 'बाईपण भारी देवा' सिनेमाची घोषणा


Ananya: आता महिला जे ठरवतील ते करुन दाखवतील, कारण 'अनन्या' येतेय; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित


Heart of Stone : प्रियांका अन् दीपिकानंतर आता आलियाची हॉलिवूड वारी; 'हार्ट ऑफ स्टोन'मध्ये साकारणार प्रमुख भूमिका


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha