Ananya Movie : बहुचर्चित 'अनन्या' (Ananya) सिनेमा अखेर 10 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने 'अनन्या'चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. 'शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे', अशी या सिनेमाची सकारात्मक टॅगलाईन आहे. हृता दुर्गुळे (Hruta Durgule) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. 


रुईया महाविद्यालयाची 'अनन्या' एकांकिका प्रचंड गाजली होती. या एकांकिकेत स्पृहा जोशी मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर या एकांकिकेचे नाटकात रुपांतर करण्यात आले. नाटकात ऋतुजा बागवेने अनन्याचे पात्र साकारले होते. नुकताच या नाटकाचा 300 वा गौरवशाली प्रयोग रंगला. अशातच महिला दिनाच्या निमित्ताने अनन्या सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे.





 'अनन्या' सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कड यांनी केले आहे.  तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. नुकतेच आऊट झालेल्या सिनेमाच्या पोस्टरमध्ये धाडसी वृत्तीची अनन्या दिसत आहे. अनन्याचा जिद्दीचा प्रवास या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अनन्या सिनेमाविषयी हृता दुर्गुळे म्हणते,"आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणि सकारात्मकता देणारा हा सिनेमा आहे".


संबंधित बातम्या


Hemangi Kavi : महिला दिनानिमित्त हेमांगी कवीकडून पोस्ट शेअर; म्हणाली 'खूप खालच्या पातळीला जाऊन हिणवलं'


Ott Web Series :  सस्पेन्स अन् सायकोलॉजिकल थ्रिलर; शेवटपर्यंत उत्सुकता ताणून धरणाऱ्या 'या' सीरिज नक्की पाहा


Gulhar : माधव अभ्यंकरांच्या लूकनं वेधलं लक्ष ; 'गुल्हर' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha