World Television Premiere : 'पावनखिंड' (Pawankhind) सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. 18 फेब्रुवारीला  'पावनखिंड' सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झाला होता. आता 19 जूनला 'पावनखिंड' सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर होणार आहे.


छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा छत्रपतींना रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव ओवाळून टाकला. याच शिलेदारांमधील महापराक्रमी आणि शूरवीर असा हिरा म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. 


19 जूनला दुपारी 1  वाजता होणार प्रीमिअर 


'तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला!' असं म्हणत आपल्या राजासाठी प्रत्यक्ष मृत्यूलाही बाजीप्रभूंनी प्रतीक्षा करायला लावली. बांदल सेनेच्या साथीने बाजीप्रभूंनी घोडखिंडीत अखेरच्या श्वासापर्यंत लढा देत गनिमाला थोपवून धरलं. बाजीप्रभूंच्या पराक्रमाने ही घोडखिंड खऱ्या अर्थाने पावन झाली. अंगावर रोमांचं आणणारं इतिहासातलं हे पान पावनखिंड या सिनेमातून पुन्हा जिवंत झालंय. प्रवाह पिक्चर या वाहिनीवरुन हाच रोमांचक इतिहास पुन्हा अनुभवता येणार आहे. रविवार 19 जूनला दुपारी 1 वाजता छोट्या पडद्यावर प्रवाह पिक्चरवर हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 


रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात कुटुंबाने एकत्र येण्याचे प्रसंग फार कमी वेळा जुळून येतात. सिनेमा हे एक असं जादुई माध्यम आहे जे संपूर्ण कुटुंबाला एकत्र आणतं. यानिमित्ताने आठवणींना उजळा मिळतो आणि नकळत चेहऱ्यावर हास्याची आणि समाधानाची लकेर उमटते. संपूर्ण कुटुंबाचा बंध अधिकाधिक घट्ट करण्यासाठी असे क्षण आयुष्यात येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हेच साध्य करण्यासाठी प्रवाह पिक्चर ही नवी वाहिनी सुरु करण्यात आली आहे. विशेष म्हणजे दर रविवारी नव्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे. पावनखिंड सिनेमापासून या धमादेकार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरची सुरुवात होणार आहे.


कधी होणार प्रीमिअर? 19 जून
कुठे होणार प्रीमिअर? प्रवाह पिक्चर
किती वाजता? दुपारी 1 वाजता 


संबंधित बातम्या


Pawankhind :  बॉक्स ऑफिसवरील यशानंतर आता 'पावनखिंड' ओटीटीवर; 'या' दिवशी होणार रिलीज


Box Office Report : सिनेसृष्टीला सुगीचे दिवस, सिनेमांची बॉक्सऑफिसवर उत्तुंग भरारी