Majhi Tujhi Reshimgath : 'माझी तुझी रेशीमगाठ' (Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील यश आणि नेहाच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सध्या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. परी नेहाची मुलगी असल्याचे सत्य आजोबांसमोर आल्याने आजोबा नाराज झाले होते. पण अखेर आजोबांनी आता यश-नेहाच्या लग्नाला परवानगी दिली आहे. 


पार पडणार नेहाचा बघण्याचा कार्यक्रम


यशच्या आजोबांनी अखेर यश-नेहाच्या लग्नाला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता लवकरच नेहाचा बघण्याचा कार्यक्रम पार पडणार आहे. बघण्याच्या कार्यक्रमा दरम्यानचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमध्ये नेहाचा बघण्याचा कार्यक्रम नेहाच्या घरी चाळीत होत आहे असे दिसत आहे. नेहाने आजोबांसाठी आणि यशच्या घरच्यांसाठी खास पोह्याचा बेत केला आहे. 


परीचं पत्र वाचून आजोबांच्या मनाला फुटला पाझर


आजोबांना परीचे सत्य माहित नसल्याने त्यांनी परीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला होता. पण अखेर आजोबांसमोर परी नेहाची मुलगी असल्याचे सत्य आले आहे. आजोबा घरातल्या कोणासोबत बोलायला तयार नसल्याने परीने आजोबांसाठी खास पत्र लिहिले होते. प्रोमोमध्ये आजोबा परीचे पत्र वाचताना दिसत आहेत. परीचं पत्र वाचून आजोबांच्या मनाला पाझर फुटला आहे. 


यश-नेहाचा पार पडणार साखरपुडा


'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत लवकरच यश-नेहाचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोत यश, परी आणि नेहा तिघेही दिसून येत आहेत. साखरपुड्यादरम्यान नेहा आणि यशने पारंपारिक लूक केलेला दिसून येत आहे. 


श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) आणि  प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच या मालिकेचे मुख्य आकर्षण म्हणजे नेहाची गोड मुलगी अर्थात परी. परीची भूमिका साकारणारी मायरा वायकुळने (Mayra Vaikul) आपल्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.


संबंधित बातम्या


Majhi Tujhi Reshimgath : यश जाणार पॅलेस सोडून चाळीत राहायला; परीचं पत्र वाचून आजोबांच्या मनाला फुटणार का पाझर?


Majhi Tujhi Reshimgath : नेहा-यशचं होणार ग्रॅंड वेडिंग; लवकरच पार पडणार साखरपुडा