Vaibhav Raghave Cancer: छोट्या पडद्यावरील ‘निशा और उसके कजन्स’ या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेता वैभव राघवे (Vaibhav Raghave) हा कॅन्सरचा सामना करत आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याला कोलन कॅन्सरच्या चौथ्या स्टेजचे निदान झाले. त्यानंतर सहा महिन्यांत त्यानं किमोथेरेपी घेतली. तसेच त्याच्यावर पुढील उपचार मुंबईमधील टाटा मेमोरियल रुग्णालयात होत आहेत. वैभवच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च करावे लागत आहेत. आता त्याच्या पुढील उपचारासाठी काही कलाकार आणि मित्रमैत्रीणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्याचे आवाहन नेटकऱ्यांकडे करत आहेत. अभिनेत्री सौम्या टंडण, अभिनेता करणवीर बोहरा, मोहसिन खान या सेलिब्रिटींनी वैभवच्या उपचारासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून आर्थिक मदतीचे आवाहन नेटकऱ्यांकडे केली आहे.  


सौम्या टंडणची पोस्ट


‘भाभी जी घर में हैं’या मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री सौम्या टंडणनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन वैभवसाठी आर्थिक मदतीचे आवाहन नेटकऱ्यांकडे केली आहे. तिनं पोस्टमध्ये लिहिलं, 'माझा प्रिय मित्र, वैभव कुमार सिंह राघवे, आम्ही त्याला प्रेमाने विभु (विभुझिंस्ता) म्हणतो, तो  कोलन कॅन्सर त्याच्या लास्ट स्टेजचा सामना करत आहे आणि त्याच्यावर मुंबईमधील टाटा मेमोरियल हॉस्पिटल, येथे उपचार सुरू आहेत.'


सैम्यानं पुढे पोस्टमध्ये लिहिलं, 'केमोथेरपीच्या सहा महिन्यांनंतर, तो मासिक इम्युनोथेरपी सायकलवर आहे. ज्याच्या एका डोसची किंमत 4 लाख 50 हजार आहे. जानेवारी 2023 मध्ये त्याला आणखी एक वर्ष इम्युनोथेरपी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे आणि नंतर त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आम्हाला त्यासाठी पैशांची गरज आहे. कारण इम्युनोथेरपीसाठी लागणारी औषधे अत्यंत महाग आहेत. त्याला जगायचे आहे आणि तो धैर्याने लढत आहे. तुम्ही त्याला मदत करुन शकता.'



सौम्यासोबतच मोहित मलिक आणि  करणवीर बोहरा यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकऱ्यांकडे वैभवच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन नेटकऱ्यांकडे केली आहे. ‘निशा और उसके कजन्स’ या मालिकेबरोबरच वैभवनं  ‘सावधान इडिंया’ या शोमध्ये देखील काम केलं आहे.  


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Anupam Kher : चित्रपट चांगला असेल तर कोणी काहीही करू शकत नाही"; पठाणच्या यशानंतर अनुपम खेर यांचं मोठं वक्तव्य