Urfi Javed : सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी ​​जावेद (Urfi Javed) नेहमीच तिच्या फॅशन सेन्स आणि हटके आउटफिटमुळे चर्चेत असतो. उर्फी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर दररोज काहीना काही नवीन पोस्ट करत असते. आपल्या फॅशनमुळे चर्चेत असलेली उर्फी सोशल मीडियावर अनेकदा ट्रोलिंगचीही शिकारही झाली आहे. मात्र, आता उर्फी चर्चेत आलीये ते तिच्या नव्या व्हिडीओमुळे! सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा माहोल आहे. या माहोलात सेलिब्रेटी देखील बाप्पाच्या भक्तीत रममाण झाले आहेत. उर्फी जावेद देखील या व्हिडीओ गणपती बाप्पाचे गुणगाण गाताना दिसली आहे.


उर्फीने नुकताच स्वतःचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत उर्फी गणेश भक्तीत तल्लीन झालेली पाहायला मिळाली. हटके फॅशनमुळे अनेकदा टीकेची धनी होत असलेल्या उर्फीचा हा सुसंस्कृत अवतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


पाहा व्हिडीओ :



सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करताना उर्फीने (Urfi Javed) कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘गणपती बाप्पा मोरया. इंडियन आयडॉलसाठी ही माझी ऑडिशन नाही. त्यामुळे ज्यांना जज व्हायचे आहे, त्यांनी कोर्टात जावे. मी फार चांगले गाऊ शकत नाही आणि मला ते माहित आहे.’


उर्फीचा लूक चर्चेत


या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद एथनिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. इतकेच नाही, तर ती गायक शंकर महादेवन यांनी गायलेली गणेश वंदना देखील म्हणताना दिसत आहे. उर्फी जावेदची ही भक्तीमे शैली सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. उर्फीची ही स्टाईल सोशल मीडिया यूजर्सना खूप आवडली आहे.


इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये उर्फी (Urfi Javed) भगवान गणेशाचे स्तवन करताना दिसत आहे.  यात ती ‘श्री गणेशाय धीमही’ गुणगुणताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये तिने कुर्ता आणि प्लाझो असा पारंपारिक ड्रेस परिधान केला आहे. यासोबतच तिने लाल रंगाचे झुमके आणि मोकळे केस ठेवून तिचा हा लूक पूर्ण केला आहे.


उर्फीचा हा सुसंस्कृत आणि नवा अवतार पाहून तिचे चाहते देखील घायाळ झाले आहेत. सोशल मीडिया युजर्स या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट करून, आपली प्रतिक्रिया देत आहेत. तिचा हा पारंपारिक अवतार काही लोकांना आवडला आहे, तर काही लोक तिला तिच्या आवाजामुळे ट्रोल देखील करत आहेत.


संबंधित बातम्या


Urfi javed : उर्फी जावेदची प्रकृती खालावली, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल 


Urfi Javed : उर्फीने घेतली चाहतची शाळा; म्हणाली, तू दोन व्यक्तींसोबत...