मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेदची  (Urfi javed) तब्येत अचानक बिघडली असून तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्फीला खूप ताप आहे, त्यामुळे त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती तिच्या नातेवाईकांनी दिली.   


उर्फी जावेदच्या जवळच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, "गेल्या दोन-तीन दिवसांपासून उर्फीची तब्येत खराब होती. गेल्या काही दिवसांपासून उर्फीचे उलट्यांचा त्रास होत आहे. आज तिला 103 ते 104 डीग्री ताप आला, त्यानंतर  तिला मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करावे लागले. तिच्या काही चाचण्या करण्यात आल्या असून या चाचण्यांमुळे तिच्या तापाचे कारण काय आहे हे कळू शकेल. सध्या चाचणीचे अहवाल येणे बाकी आहे.
 
उर्फीला गेल्या दोन-तीन दिवसांपासून उलट्या होत होता. मात्र, रिपोर्ट्स आल्यानंतर उर्फीची प्रकृती कशी आहे, हे कळेल, असे नातेवाईकांनी सांगितले आहे. 


 






उर्फी जावेद सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून आजारी पडल्यामुळे ती  सोशल मीडियावर सक्रिय राहिली नाही. अलीकडेच उर्फी पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती. उर्फीने पिवळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घातला होता. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत होती. 


उर्फ ​​जावेदने नुकताच सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री चाहत खन्नाचा क्लास घेतला आहे.    चाहतने उर्फीच्या कपड्यांवर कमेंट केली होती, ज्यामुळे उर्फी नाराज झाली. त्यामुळे उर्फीने चाहतचा क्लास घेतला. शिवाय ड्रेसवरून ट्रोल करणाऱ्यांना उर्फीने चोख प्रत्युत्तर दिले आहे.