Marathi Serials : महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी कायमच आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक केदार शिंदे यांनी ‘कलर्स मराठी’चे प्रोग्रामिंग हेड म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर नवनवीन मालिका रसिकांच्या भेटीला येत आहेत.'इंद्रायणी', 'सुख कळले', 'हसताय ना, हसायलाच पाहिजे! ’ या नव्या शोजनंतर 'अबीर गुलाल' या नव्या मालिकेचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला असतानाच आता 'अंतरपाट' ही आणखी एक नवीन मालिका रसिकांच्या भेटीला आली आहे.


'सुख कळले' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता कलर्स मराठी आणखी एक नवी मालिका घेऊन आपल्यासमोर सज्ज झाली आहे. 'अबीर गुलाल', असे या नव्या मालिकेचे नाव असून काही दिवसांआधी या नव्या मालिकेचा टिझर रिलिज झाला. त्यामध्ये आपण दोन अनोळखी मुलींचे नशीब कसे एका रात्रीत बदलले, हे पाहिले. या दोघी आता मोठ्या असून या नव्या प्रोमोमध्ये तुम्हाला त्यांची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. 


'अबीर गुलाल'चा प्रोमो आऊट!


प्रोमोमध्ये सावळी मुलगी एका गोऱ्या कुटुंबियांच्या घरात तर, गोरी मुलगी सावळ्या, श्रीमंत घरात दिसून येत आहे. सावळ्या मुलीचे नाव श्री तर, गोऱ्या मुलीचे नाव शुभ्रा असून शुभ्रा तिच्या आईवडिलांची लाडकी आहे पण, ती त्यांच्या वर्णामुळे त्यांच्यासोबत वाईट वागत आहे तर, दुसरीकडे श्रीच्या घरात सगळे गोरे असून तिचे वडील तिला सावळ्या रंगामुळे वाईट वागणूक देत आहेत. श्रीचा स्वभाव मनमोकळा, निरागस आणि प्रेमळ तर, शुभ्राचा रागीट स्वभाव पाहायला मिळत आहे. काय आहे  श्री आणि शुभ्राच्या नशिबात? जाणून घेण्यासाठी पाहा  'अबीर गुलाल'. या मालिकेचा नवीन प्रोमो तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर अथवा इंस्टग्राम किंवा फेसबुकवर पाहू शकता. 


नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने आणला दुराव्याचा 'अंतरपाट'


'अंतरपाट' या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला असून,  त्यात हळदीचा समारंभ सुरू असल्याचे दिसतेय. उल्हासित, आनंदी वातावरण, लग्नाची लगबग, सजलेले घर, पाहुण्यांचा वावर दिसत आहे. लव्ह मॅरेजच्या काळात अरेन्ज मॅरेज करणाऱ्या गौतमीला परफेक्ट जोडीदार मिळाल्याने ती अतिशय आनंदी आहे. गौतमीला आपल्या जोडीदारासोबत प्रत्येक स्वप्नं पूर्ण करायचे आहे. प्रोमोमध्ये आपल्याला मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री रेशम टिपणीसही दिसत असून ती नवऱ्याच्या म्हणजेच क्षितीजच्या बाजुने आहे. गौतमीला वाटतेय की, क्षितिज हा सर्वोत्तम आणि परिपूर्ण असा नवरा आहे, जसा तिला हवा होता, अगदी तसा. पण खरंच  क्षितिज या लग्नाने खुश आहे का? काय लिहिले आहे गौतमीच्या नशिबात?  नशिबाने मांडला लग्नाचा घाट, पण नियतीने आणला दुराव्याचा अंतरपाट!


संबंधित बातम्या


Bollywood Actress : वयाच्या 72 व्या वर्षी केलं 'लिपलॉक', देवानंदच्या भाच्यासोबत होतं अफेअर; पाच राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेली 'ही' अभिनेत्री कोण?