Bollywood Actress Filmy Story : बॉलिवूडच्या (Bollywood) अनेक अभिनेत्रींनी 70 च्या दशकात सिनेसृष्टीवर राज्य केलं आहे. यातील काही अभिनेत्रींना रातोरात स्टारडम मिळालं. पण त्या आता सिनेविश्वापासून दूर आहेत. पण काही अभिनेत्रींनी मात्र 70 च्या दशकात आपल्या करिअर प्रवासाची सुरुवात केली आणि आजही इंडस्ट्रीमध्ये त्या टिकून आहेत. बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीने 1974 मध्ये सिनेविश्वात पदार्पण केलं. आता या अभिनेत्रीच्या सिनेसृष्टीतील करिअरला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. 50 वर्षांच्या या करिअरमध्ये अभिनेत्रीने आपल्या प्रतिभेच्या जोरावर एक, दोन नव्हे तर पाच राष्ट्रीय पुरस्कार आपल्या नावे केले आहेत. सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह पद्मश्री आणि पद्मभूषण सारख्या पुरस्कारांवरदेखील तिने आपलं नाव कोरलं आहे.
वयाच्या 72 व्या वर्षी 'लिपलॉक'मुळे आली चर्चेत
बॉलिवूडची ही अभिनेत्री 73 वर्षांची झाली आहे. गेल्या वर्षी अभिनेत्री करण जोहरच्या चित्रपटात झळकली होती. वयाच्या 72 व्या वर्षी लिपलॉक सीन केल्यामुळे अभिनेत्री चर्चेत आली होती. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून 70 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आणि कवी कैफी आजमीची मुलगी शबाना आजमी (Shabana Azmi) आहे.
शबाना आजमीच्या फिल्मी करिअरला 50 वर्षे पूर्ण
शबाना आजमीने 1974 मध्ये 'अंकुर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासह डर', 'पार', 'गॉडमदर', 'मंडी', 'फायर', 'जुनून', 'शतरंज के खिलाड़ी', 'परवरिश' सारख्या अनेक चित्रपटांच्या माध्यमातून शबाना आजमीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अभिनेत्रीच्या फिल्मी करिअरला आता 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त न्यू यॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या फायर चित्रपटाचं खास स्क्रीनिंग ठेवण्यात आलं होतं.
'या' चित्रपटात केलाय 'लिपलॉक'
शबाना आजमीने अमिताभ बच्चनसह नसीरुद्दीन शाहपर्यंत अनेक कलाकारांसोबत काम केलं आहे. करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात ती शेवटची दिसून आली. या चित्रपटात अभिनेत्री धर्मेंद्रसोबत लिपलॉक करताना दिसून आली होती. एकीकडे धर्मेंद्र आणि शबानाची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. तर दुसरीकडे त्यांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
देवानंदच्या भाच्यासोबत होतं अफेअर
शबाना आजमी वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत आली आहे. शबाना आजमी आणि दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली. शेखर देवानंदचा भाचा होता. शबाना आणि शेखर लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. पण पुढे दोघांचे रस्ते वेगळे झाले आणि शबानाने जावेद अख्तरसोबत संसार थाटला.
संबंधित बातम्या