Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेत मंजुळाची एन्ट्री झाल्यापासून मोनिकाची डोकेदुखी वाढली आहे. मंजुळाला आता मोनिकाचं एक गुपित कळणार आहे. हे गुपित मंजुळा ही स्वराज आणि मल्हार यांना सांगणार का? याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही मोनिकाच्या कानशिलात लगावते.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा नुकताच एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मोनिका ही बेडरुममध्ये जाते. तितक्यात मंजुळा येते आणि मोनिकाच्या कानशिलात लगावते. मोनिका देखील मंजुळावर हात उगारते. पण मंजुळा ही मनोकाचा हात पकडते. मंजुळा ही मोनिकाला म्हणते, "हात आवाज आणि माज तिन्ही खाली ठेवायचा, तुझं गुपित माझ्या ताब्यात आहे, तुझी पिहू तुला मल्हार साहेबांपासून झालेली नाही."
मोनिकाचं हे गुपित केवळ मंजुळाला माहित आहे. आता मंजुळा हे गुपित स्वराज आणि मल्हार यांना सांगणार का? या प्रश्नाचं उत्तर प्रेक्षकांना या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये मिळेल.
पाहा प्रोमो:
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या दुसऱ्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराने मंजुळाचा चेहरा मल्हारला दाखवण्याचा निर्धार केला आहे. मंजुळा हे वैदेही सारखी दिसते हे मल्हारला कळणार का? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा आगामी एपिसोड बघावा लागेल.
काही महिन्यांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधील वैदेही या भूमिकेचा मृत्यू झाला. वैदेही ही मल्हारची पहिली पत्नी आणि स्वराज उर्फ स्वराची आई होती. वैदेहीच्या मृत्यूनंतर मंजुळाची मालिकेत एन्ट्री झाली. मंजुळा ही वैदेहीसारखी दिसते.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो. तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरनं साकरली होती. आता ऊर्मिला ही या मालिकेतील मंजुळा ही भूमिका साकारत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: