Tuzech Mi Geet Gaat Aahe:   तुझेच मी गीत गात आहे  (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या छोट्या पडद्यावरील मालिकेमधील विविध ट्वीस्ट अँड टर्न्स येत असतात. तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही वैदेही सारखी दिसते.  वैदेही ही मल्हारची पहिली पत्नी आणि स्वराज उर्फ स्वराची आई होती. काही महिन्यांपूर्वी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमधील वैदेही या भूमिकेचा मृत्यू झाला. मंजुळाचा चेहरा स्वराजनं पाहिला आहे, पण मल्हारनं पाहिला नाही. तुझेच मी गीत गात आहे मालिकेचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिसते की, स्वराजला एक वाईट स्वप्न पडते. 


तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, स्वराजला एक वाईट स्वप्न पडते. या स्वप्नात त्याला दिसते की, मंजुळा ही तिचा चेहरा मल्हारला दाखवते. मंजुळाचा चेहरा पाहिल्यानंतर मल्हारला वाटतं की, ती वैदेही आहे. मल्हार मंजुळाला पाहून रडतो. तो मंजुळाची माफी देखील मागतो. तेवढ्यात मल्हारच्या छातीत दुखते. तो खाली पडतो. मल्हारला हा त्रास स्वराजमुळे होत आहे, असं वाटतं. तेवढ्यात स्वराजला जाग येते. स्वराजला कळतं की तो स्वप्न पहात होता. स्वराज  मल्हारच्या जवळ जाऊन बसतो. 


पाहा प्रोमो: 



मल्हार हा मंजुळाचा चेहरा कधी पाहणार? मंजुळाला ती वैदेही सारखी दिसते हे कधी कळणार? स्वराज हा स्वरा आहे, हे मोनिका आणि पिहूला कळणार का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना तुझेच मी गीत गात आहे  या मालिकेत मिळणार आहेत.


तुझेच मी गीत गात आहे  या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो. तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरनं साकरली होती. ऊर्मिला ही या मालिकेतील मंजुळा ही भूमिका साकारत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Tuzech Mi Geet Gaat Aahe: मंजुळा मोनिकाला देणार जशास तसे उत्तर; 'तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेचा प्रोमो पाहिलात?