Tuzech Mi Geet Gaat Aahe: तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी मंजुळाची एन्ट्री झाली आहे. मंजुळा ही स्वराज ऊर्फ स्वराची आई आणि मल्हारची पहिली पत्नी वैदेहीसारखी दिसते. नुकताच 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये मंजुळा ही पिहूला लावणी शिकवताना दिसत आहे.
'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, मंजुळा ही पिहूला लावणी शिकवत आहे. तेवढ्यात मोनिका तिथे येते आणि म्हणते, 'थांबवा हा तमाशा'. त्यानंतर मोनिका मंजुळावर हात उगारते. तेवढ्यात मंजुळा ही मोनिकाचा हात पकडते आणि म्हणते, 'माझ्यावर हात उगारायचा नाही, तोच हात तोडून गळ्यात लटकवीन'
आता मंजुळा आणि मोनिका यांच्यामध्ये भांडण होईल? की मोनिका ही मंजुळाला घराबाहेर जायला सांगेल? या प्रश्नांची उत्तरं आता 'तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेच्या आगामी एपिसोडमध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत.
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या गेल्या एपिसोडमध्ये दिसले की, मंजुळा ही स्वराज ऊर्फ स्वराला लावणी शिकवत आहे. यावेळी स्वराज मंजुळाला म्हणतो, 'लावणी तर मुलीच गातात ना?' यावर मंजुळा म्हणते, 'आपलं लोक संगीत खूप समृद्ध आहे. यामध्ये भारुड आहे, गवळण आहे. हे सगळे आपल्या लोकपरंपरेचे रुपं आहेत. हे बाईचं हे पुरुषाचं, असं यात काही ठरलेलं नसतं. मनातील भाव खरे असतील आपलं संगीत हे ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचतं. संगीत हे फक्त संगीत असतं सगळ्यांनी संगीताचा आनंद घ्यायचा असतो.'
तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मल्हार कामत ही भूमिका अभिनेता अभिजीत खांडकेकर हा साकारतो. तर स्वरा उर्फ स्वराज ही भूमिका अवनी तायवाडे ही साकारते. स्वराची आई म्हणजेच वैदेही मल्हार कामत ही भूमिका अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरनं साकरली होती. आता ऊर्मिला ही या मालिकेतील मंजुळा ही भूमिका साकारत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: