Anupamaa: छोट्या पडद्यावरील 'अनुपमा' (Anupamaa) या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेमधील अभिनेत्री  रुपाली गांगुली  (Rupali Ganguly)  यांच्या अभिनयाचे अनेक जण कौतुक करतात. नुकताच रुपाली यांनी एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रुपाली आणि अनुपमा या मालिकेतील गुरुमा ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपरा मेहता या 'बहरला हा मधुमास नवा'  या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. 


रुपाली गांगुली  यांनी 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. रुपालीनं हा व्हिडीओ शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं,'मराठी गाण्यावर डान्स करताना आनंद झाला. आम्ही हा ट्रेंड जरा उशीरा फॉलो केला. उत्कृष्ट कलाकार आणि   उत्कृष्ट परफॉर्मर असणाऱ्या  अपराजी यांच्यासोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना खूप आनंद होतो.' रुपाली यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला अपरा यांनी कमेंट केली, 'प्रिय रुपाली, तुझ्यासोबत परफॉर्म करताना मला आनंद होत आहे.  कलेवर मनापासून प्रेम करणाऱ्या मोजक्या कलाकारांपैकी तू एक आहेस.  तू जशी नम्र आहेस, तशीच रहा. देव तुला आशीर्वाद देईल.'


रुपाली गांगुली आणि अपरा मेहता यांच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती मिळत आहे.  नेटकऱ्यांनी या रुपाली आणि अपरा यांच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 


पाहा व्हिडीओ






'बहरला हा मधुमास नवा' हे महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील गाणं गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अनेक नेटकरी या गाण्यावरील रिल्स सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 


13 जुलै 2020 रोजी  अनुपमा  या मालिकेचा प्रिमिअर झाला. गेली तीन वर्षी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अनुपमा (Anupamaa) या मालिकेमध्ये रुपाली गांगुली ही अनुपमा ही भूमिका साकारते तर वनराज ही भूमिका सुधांशू पांडे हा साकारतो. गौरव खन्ना हा या मालिकेत अनुज ही भूमिका साकारतो. अनुपमा मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Anupamaa Spoiler Alert: शाह कुटुंबाच्या घरात खास व्यक्तीची होणार एन्ट्री; 'अनुपमा' मालिकेत काय घडणार? जाणून घ्या