Tunisha Sharma: टिव्ही कलाकार तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्या प्रकरणातील आरोपी  शिझान खानला (Shizan Khan) हायकोर्टानं दिलासा देण्यास नकार दिलाय. तुनिषाला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याबद्दल पालघर पोलिसांनी शिझानविरोधात दाखल केलेली गुन्हा रद्द करण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता शिझानसमोर सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अखेरचा पर्याय शिल्लक आहे. मात्र तोपर्यंत त्याच्याविरोधातील खटला आणि पुढची कायदेशीर कारवाई सुरू ठेवण्याचा पोलिसांपुढचा मार्ग आता मोकळा झाला आहे.


सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय दिसले?


तुनिषानं ज्या दिवशी आत्महत्या केली त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज पाहता ती सामान्य आणि आनंदी दिसत होती. सेटवरही ती तशीच वावरत होती. त्यानंतर ती आरोपीच्या खोलीत जाताना दिसत असून तिथून ती बरीच अस्वस्थ होऊन बाहेर आल्याचं सीसीटीव्हीत आढळून येत असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आलाय.


काय आहे प्रकरण?


छोट्या पडद्यावरील अभिनेत्री तुनिषा शर्मानं 24 डिसेंबर 2022 रोजी अली बाबा - दास्तान-ए-काबुल’ च्या पालघर जिल्ह्यातील वसई येथील सेटवर आत्महत्या केली होती. या प्रकरणात तुनिषाचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार शिझान खानला दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी अटक केली होती. शिझाननं गुन्हा रद्द करून जामीनाची मागणी करत हायकोर्टात याचिका केली होती. तपास प्रगतीपथावर असला तरीही संथ गतीने सुरू असल्याचा दावा याचिकेतून केला गेला होता. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमूख यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.


सुनावणीदरम्यान तपासाबाबत हायकोर्टानं राज्य सरकारकडे विचारणा केली असता तपास योग्य दिशेने सुरू असून याप्रकरणी तुनिषा, शिझान आणि त्यांच्या एका मित्राचा फोन न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यावरील अहवाल आल्यावर पुढील तपासाला गती मिळेल. तसेच आतापर्यंत 164 जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याची माहितीही राज्य सरकराच्यावतीनं हायकोर्टाला दिली होती.


जाणून घ्या तुनिषा शर्माबद्दल...




तुनिषा शर्माने 'भारत का वीर पुत्तर : महाराणा प्रताप' (Bharat Ka Veer Putra : Maharana Pratap), 'इंटरनेट वाला लव' (Internet Wala Love), 'इश्क सुभान अल्लाह' (Ishq Subhan Allah) अशा अनेक मालिकांमध्ये काम केलं होतं. तुनिषाच्यानं आत्महत्या केल्यानं अनेकांना धक्का बसला होता. 






वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Sheezan Khan : अखेर 70 दिवसांनतर शिझान खानची तुरुंगातून सुटका, तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात होता अटकेत