Marathi Serials : छोट्या पडद्यावर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करणाऱ्या मालिका येत आहे. या विविध धाटणीच्या मालिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. टीआरपीच्या शर्यतीत या मालिकांनी बाजी मारली आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेपासून 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) पर्यंत अनेक मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. जाणून घ्या 'टॉप 5' (Top 5 Marathi Serials) मालिकांबद्दल...
1. ठरलं तर मग (Tharla Tar Mag) :
'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. जुई गडकरी आणि अमित भानुशाली या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. आदेश आणि सुचित्रा बांदेकर या मालिकेचे निर्मिते आहेत. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.7 रेटिंग मिळाले आहे.
2. तुझेच मी गीत गात आहे (Tuzech Mi Geet Gaat Aahe) :
'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे. या मालिकेत अभिजीत खांडकेर आणि उर्मिला कानेटकर मुख्य भूमिकेत आहेत. ही पहिली मराठी सांगीतिक मालिका आहे.
3. प्रेमाची गोष्ट (Premachi Goshta) :
'प्रेमाची गोष्ट' ही मालिका काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेतील नात्यांची गुंफन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका 'ये है मोहब्बतें' या मालिकेचा रिमेक आहे.
4. सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) :
'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका चौथ्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.1 रेटिंग मिळाले आहे. गिरीजा प्रभू या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत आहे.
5. आई कुठे काय करते (Aai Kuthe kay Karte) :
'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका असून गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. आजही या सिनेमाची क्रेझ कायम आहे. टीआरपीच्या शर्यतीत ही मालिका पाचव्या क्रमांकावर असून या मालिकेला 6.0 रेटिंग मिळाले आहे. एकीकडे या मालिकेच्या कथानकावर टिका होत आहे. तर दुसरीकडे मात्र मालिकाप्रेमींना ही मालिका आवडत आहे.
संबंधित बातम्या