Khatron Ke Khiladi 13 Winner : 'खतरों के खिलाडी 13' (Khatron Ke Khiladi 13) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता हा कार्यक्रम अंतिम टप्प्यात आला आहे. लवकरच या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) हा कार्यक्रम होस्ट करत आहे. 


'खतरों के खिलाडी 13'चा विजेता कोण होणार? 


'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याच्या शूटसाठी एक दिवस बाकी आहे. या कार्यक्रमाआधी अभिनेत्री अर्चना गौतम (Archana Gautam) स्पॉट झाली असून तिने विजेता कोण असेल यावर भाष्य केलं. अर्चना म्हणाली,"खतरों के खिलाडी 13'चा विजेता कोण असेल याचा मला अंदाज आहे पण मी सांगू शकत नाही". त्यामुळे आता 'खतरों के खिलाडी 13'चा विजेता कोण असेल हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, 'खतरों के खिलाडी 13'च्या टॉप पाच स्पर्धकांमध्ये ऐश्वर्या शर्मा (Aishwarya Sharma), शिव ठाकरे (Shiv Thakare), अर्जित तनेजा, डीनो जेम्स आणि नायरा बॅनर्जी या स्पर्धकांचा समावेश होता. नेटकऱ्यांच्या मते ऐश्वर्या शर्मा या कार्यक्रमाची विजेती असेल. तर आपला माणूस शिव ठाकरेलाही चाहत्यांचा पाठिंबा असून तो या कार्यक्रमाचा विजेता व्हावा अशी इच्छा चाहत्यांकडून व्यक्त केली जात आहे. 


'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमात स्पर्धक स्टंटबाजी करताना दिसत आहे. या खेळादरम्यान अनेक स्पर्धक जखमी झाले तर काहींनी मात्र खेळ अर्धवट सोडला. 'खतरों के खिलाडी' या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा येत्या 14 ऑक्टोबरला पार पडणार आहे. 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमाची जागा आता सलमान खानचा (Salman Khan) 'बिग बॉस 17' हा कार्यक्रम घेणार आहे.


'खतरों के खिलाडी 13'मध्ये 'या' स्पर्धकांचा होता समावेश


'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमात शिव ठाकरे, ऐश्वर्या शर्मा, अंजली आनंद, अंजुम फेक, रश्मीत कौर, डीने जेम्स, अर्चना गौतम, शीझान खान, डेजी शाह, रुही चतुर्वेदी, नायरा बॅनर्जी आणि सौंदस मौकफीर हे स्पर्धक सहभागी झाले होते. आता 'खतरों के खिलाडी 13' या कार्यक्रमात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


'खतरों के खिलाडी 13' हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या कार्यक्रमाने बाजी मारली आहे. आता हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेत असून 'बिग बॉस 17' हा वादग्रस्त कार्यक्रम सुरू होत आहे.


संबंधित बातम्या


Khatron Ke Khiladi 13: शिव ठाकरे ते डेझी शाह; 'खतरों के खिलाडी 13' च्या ग्रँड फिनालेसाठी कलाकारांनी केला खास लूक