Sukh Mhanje Nakki Kay Asta : छोट्या पडद्यावीर प्रसिद्ध मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेत एका खास पाहुण्याची एन्ट्री झाली. मालिकेतील गौरी या भूमिकेसारखी सारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झाली. ती गौरीसारखी दिसत असली तरी तिचा अंदाज मात्र निराळा आहे. मालिकेतील या ट्विस्टला नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. 


जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला असं वाटले होते पण गौरी सारख्या दिसणाऱ्या मुलीची एन्ट्री या मालिकेत झाली आहे. मालिकेतील गौरी ही साधीभोळी असली तरी ही आलेली पाहुणी मात्र अरे ला कारे करणारी आहे. या ट्विस्टची अनेक नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे. एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर कमेंट केली, 'आम्ही गेली अनेक दिवस ही मालिका पाहात आहोत. या मालिकेची कथा आता थोडी खराब वळणावर जाताना दिसत आहे. यामुळे अनेक प्रेक्षकांचा या मालिकेवरून इंट्रेस जात आहे.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'तुम्ही गौरीचा लूक किती वेळा बदलणार आहात? ' एका यूझरनं कमेंट केली, 'हा कसला खेळ आहे? जयदीप गौरीवर एवढं प्रेम करत होता, तरी त्यानं तिला का मारलं असेल?' 



'सुख म्हणजे नक्की काय असतं'  या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, मीनाक्षी राठोड, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कालकार प्रमुख भूमिका साकरतात. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. 


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha