Thipkyanchi Rangoli :  स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी मालिकेत  (Thipkyanchi Rangoli) मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील कलाकार त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. या मालिकेत सध्या शशांक आणि अपूर्वाच्या लग्नाची तयारी सुरू आहे. कानेटकर आणि वर्तक कुटुंबाने लग्नाची जय्यत तयारी केली असून लग्नाआधीच्या विधींना सुरुवात झालीये. रंग माझा वेगळा मालिकेतील दीपाच्या हजेरीत केळवण पार पडल्यानंतर आता हळदीसाठीही खास पाहुणे हजेरी लावणार आहेत. 


शशांक अपूर्वाच्या हळदीला वैशाली सामंत (Vaishali Samant), आदर्श शिंदे (Adarsh Shinde) आणि फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील कीर्ती खास हजेरी लावणार आहेत. हळद म्हणलं की नाचगाणं हे आलंच. वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे यांच्या सुपरहिट गाण्याने हळदीच्या कार्यक्रमाची रंगत आणखी वाढणार आहे. 






जिलेबीसारखा गोडवा जपणारा शशांक आणि लवंगी मिरची प्रमाणे ठसक्याला आणि चवीला कमी नसणारी अपूर्वा. दोघांचे स्वभाव परस्परविरोधी असले तरी दोघांना एकत्र जोडून ठेवणारा दुवा म्हणजे कुटुंबावरचं प्रेम. याच कुटुंबावरच्या  प्रेमाने दोघांना एकत्र यायला भाग पाडलं आहे. लग्न म्हणजे दोन मनांचं नाही तर दोन कुटुंबांचं मिलन असतं. एकत्र कुटुंब पद्धतीचं महत्व अधोरेखित करणाऱ्या ठिपक्यांची रांगोळी या मालिकेतला हा विवाहसोहळा फक्त वर्तक आणि कानेटकर परिवारच नाही तर संपूर्ण प्रवाह परिवार साजरा करणारा आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Thipkyanchi Rangoli : अपूर्वा आणि शशांकच्या केळवणाला दीपानं लावली हजेरी; ठिपक्यांची रांगोळी मालिकेचा खास एपिसोड 


Deepika Padukone : ...म्हणून शूटिंग सेटवर दीपिका घेऊन जाते रंगीत पेन्सिल बॉक्स!


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha