Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत आता एक ट्विस्ट येणार आहे. इंद्रा-दीपूच्या प्रेमाचे सत्य अखेर देशपांडेसमोर आले आहे. त्यामुळे मालिकेच्या आगामी भागात देशपांडे सर इंद्राच्या घरी दीपूसाठी मागणी घालायला जाणार आहेत. 


सानिकामुळे दीपू-इंद्राला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार


इंद्रा-दीपूच्या प्रेमात सानिका मिठाचा खडा टाकणार आहे. सानिकाला दीपू साळगावकरांची मोठी सून म्हणून नको आहे. त्यामुळे ती अनेक कारस्थानं करणार आहे. त्यामुळे लग्नाआधीपासूनच दीपू आणि इंद्राला अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे. पण प्रेक्षकांना मात्र मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 


सानिकाचा हट्टीपणा दीपूच्या जीवावर बेतला होता. पण इंद्रावरील प्रेमामुळे दीपू कोमातून बाहेर आली आहे. दीपू कोमातून बाहेर येण्यासाठी इंद्राला अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. सानिकामुळे दीपूचा अपघात झाल्याचे सत्यदेखील देशपांडे सरांसमोर आले आहे. त्यामुळे सानिकावर देशपांडे सर नाराज आहेत. 






तुझी इच्छा असो वा नसो दीपूच होणार साळगावकरांची मोठी सून असे 'मन उडू उडू झालं' मालिकेच्या आगामी भागात इंद्राची आई सानिकाला सांगताना दिसणार आहे. दीपू कोमातून बाहेर आल्यामुळे मालिकेत सध्या आनंदी वातावरण पाहायला मिळत आहे. 


'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zhala) ही मालिका तरुणांच्या पसंतीस उतरते. मालिकेत हृता दुर्गुळे (Hruta Durgule) दीपूची भूमिका साकारत आहे. तर अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) इंद्राचे पात्र साकारत आहे. इंद्रा आणि दीपूची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या दोघांचा चाहतावर्गदेखील मोठा आहे. हृता दुर्गुळे नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.


संबंधित बातम्या


Man Udu Udu Zhala : दीपू कोमातून बाहेर येण्यासाठी इंद्रा देणार अग्निपरीक्षा; रंगणार एक तासाचा विशेष भाग


Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवा ट्विस्ट; दीपू येणार कोमातून बाहेर