Band Baaja Varaat : ‘झी मराठी’वरील ‘बँड बाजा वरात’ (Band Baaja Varaat) या कार्यक्रमाने अनेक नवं दाम्पत्यांना आहेर देऊन त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस अजून खास बनवला. आता या पर्वात प्रेक्षकांची लाडकी सेलिब्रिटी जोडपी सहभागी होणार आहेत. आपण नेहमी कलाकारांच्या लग्नाचा थाट फोटोज मधून पाहत आलो आहोत. पण, जर प्रत्यक्षात आपल्याला एका सेलिब्रिटी जोडप्याचं लग्न पाहायला मिळालं तर? हो.. आता हे शक्य आहे! नव्या ‘बँड बाजा वरात, सेलिब्रिटींच लग्न जोरात’ या कार्यक्रमामुळे हे शक्य होणार आहे.
अभिनेत्री मृण्मयी देशपांडे जेव्हा प्रोमोमध्ये 'का सांगू मी अशोक मामा कोणाशी लग्न करत आहेत?' असं म्हणते, तेव्हापासून ते ऐकून सर्व प्रेक्षक गोंधळात पडले आहेत. या कार्यक्रमात प्रेक्षकांना कलाकारांच्या लग्नाची गंमत पहायला मिळणार असून, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे.
पाहा प्रोमो :
या कार्यक्रमातून प्रेक्षकांना प्रत्येक आठवड्यात सेलिब्रिटीजच्या लग्नाचा थाट, त्यांचा आता पर्यंतचा प्रवास त्यातील गमती-जमती पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे सेलिब्रिटीजना देखील त्यांच्या लग्नातील काही खास क्षण पुन्हा एकदा जगण्याची संधी मिळणार आहे. या आठवड्यात प्रेक्षकांना अभिनेता भारत गणेशपुरे व त्यांच्या सौ आणि अभिनेत्री किशोरी शहाणे वीज आणि त्यांचे पती दीपक बलराज वीज यांच्या लग्नाची धूम पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाची धमाल मजामस्ती प्रेक्षकांना 17 जूनपासून रात्री 9.30वाजता झी मराठीवर पाहायला मिळणार आहे.
सामान्यांनीही केली धमाल!
या आधी ‘बँड बाजा वरात’ या कार्यक्रमात काही सामान्य जोडप्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी त्यांची लग्न कशी जुळली? हा प्रवास कसा होता, हे प्रेक्षकांसोबत शेअर केलं. रिअॅलिटी शो म्हंटल की, प्रेक्षकांना गाणं किंवा डान्सची स्पर्धा डोळ्यासमोर येते पण 'बँड बाजा वरात' या कार्यक्रमात लग्न ठरलेली जोडपी आणि त्यांची कुटुंबं सहभागी झाली होती. त्यांच्यामध्ये स्पर्धा पार पडल्या. त्यांच्यासोबत वेगवेगळे खेळ खेळले गेले होते.
प्रेक्षकांकडून 'बँड बाजा वरात' या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात सहभागी होणारे स्पर्धक वेगवेगळ्या क्षेत्रातले होते. मात्र, आता हे पर्व संपले असून, नव्या पर्वत सेलिब्रिटी जोड्या सहभागी होणार आहेत. 'बँड बाजा वरात' हा प्रयोगशील कार्यक्रम प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणार आहे.
हेही वाचा :
Hemangi Kavi : 'वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा...'; हेमांगीची पोस्ट पुन्हा चर्चेत