The Kashmir Files :  चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा चित्रपट 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याआधी या चित्रपटाचे निर्माते चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी स्क्रीनिंगला उपस्थित असणाऱ्या  प्रेक्षकांनी या चित्रपटाचे कौतुक केले. 'द कश्मीर फाइल्स' चित्रपटाला अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. या चित्रपटाचे प्रमोशन 'द कपिल शर्मा' (The Kapil Sharma Show) शोमध्ये करण्याचा सल्ला चाहत्यांनी विवेक अग्निहोत्री यांना दिला. पण त्या चाहत्यांना उत्तर देत विवेक यांनी कपिलवर आरोप केले आहेत.  


विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सांगितलं, 'द कपिल शर्मा शो' च्या टीमकडे आम्ही प्रमोशनसाठी विचारले. पण त्यांनी नकार दिला. 'चंदन राजपूत नावाच्या यूझरनं पोस्टमध्ये लिहिले, 'द कपिल शर्मा शोमध्ये आम्हाला या चित्रपटाचा प्रोमो बघायचा आहे.' या कमेंटवर विवेक यांनी रिप्लाय दिला, 'त्यांनी आम्हाला या शोमध्ये बोलवलं नाही. कारण आमच्या चित्रपटामध्ये कोणताही मोठा स्टार नाही. '


पुढे पोस्टमध्ये विवेकनं लिहिलं, 'मी ठरवू शकत नाही की कपिलनं त्याच्या शोमध्ये कोणाला आमंत्रण दिलं पाहिजे. तो त्याचा आणि कार्यक्रमाच्या निर्मात्यांचा निर्णय आहे. '


विवेक अग्निहोत्री यांची पोस्ट-






मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, प्रकाश बेलावडी, अनुपम खेर दर्शन कुमार, भाषा सुंबली, चिन्मय मंडलेकर, पुनीत इस्सर, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाइक हे कलाकार या सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha