The Kapil Sharma Show : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय कॉमेडी शो 'द कपिल शर्मा शो'ने (The Kapil Sharma Show) लोकांना नेहमीच खूप हसवले आहे. आता चाहते या शोच्या आगामी सीझनची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कपिल शर्मा शोच्या नवीन सीझनचा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. हा प्रोमो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या नव्या सीझनमध्ये जुन्या सीझनमधील काही कलाकार आहेत, तर काही नव्या कलाकारांची एन्ट्री देखील या सीझनमध्ये होणार आहे. 


या शोचा नवा प्रोमो समोर आल्यापासून चाहत्यांची उत्सुकता द्विगुणित झाली आहे. कपिल शर्मा शोच्या (The Kapil Sharma Show) नवीन सीझनमध्ये अनेक गोष्टी खास असणार आहेत. या सीझनमध्ये कपिल शर्माच्या सासू-सासऱ्यांची एन्ट्री होणार आहे.


पाहा प्रोमो :



‘कपिल शर्मा शो’ पुन्हा एकदा दणक्यात सुरू होणार आहे. हा शो 10 सप्टेंबरपासून टीव्हीवर पुनरागमन करत आहे. यावेळी प्रेक्षकांना या शोमध्ये काही नवीन आणि काही जुने चेहरे पाहायला मिळणार आहेत. प्रोमोमध्ये प्रत्येकाचा नवा लूक पाहायला मिळत आहे. या शोचा पहिला एपिसोड कसा असेल, हे काही दिवसांतच कळणार आहे. प्रोमोमध्ये कपिल शर्माचे नवीन कुटुंब देखील दिसत आहे.


प्रोमोमध्ये अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती, कपिल शर्माच्या पत्नीच्या अर्थात ‘भूरी’च्या भूमिकेत दिसत आहे. दुसरीकडे, या शोमध्ये आता कपिल शर्माच्या सासऱ्यांची एन्ट्री होणार आहे. प्रेक्षकांना कॉमेडीचा नवा डोस मिळणार आहे.


प्रेक्षकांना मिळणार मनोरंजनाची मेजवानी


10 सप्टेंबरपासून हा नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर कपिल पुन्हा एकदा त्याच्या संपूर्ण टीमसह सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता प्रेक्षक या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट बघत आहेत. कपिलनं हा प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी कपिलला या नव्या सीझनसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


पहिल्याच भागात दिसणार अक्षय कुमार


गेल्या काही दिवसांपासून कपिल आणि त्याची टीम 'द कपिल शर्मा शो'च्या नव्या पर्वाची तयारी करत आहेत. 'द कपिल शर्मा शो'च्या येत्या पर्वातील पहिल्या भागात अक्षय कुमार सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. 'द कपिल शर्मा शो'च्या आगामी भागात अक्षय त्याच्या आगामी 'कटपुतली' सिनेमाचं प्रमोशन करताना दिसून येणार आहे. त्यामुळे या भागात अक्षय कुमारसह रकुल प्रीत सिंह आणि सरगुन मेहतादेखील हजेरी लावणार आहेत.


संबंधित बातम्या


The Kapil Sharma Show Date Out : प्रतीक्षा संपली; 'द कपिल शर्मा शो' सप्टेंबरमध्ये होणार सुरू


The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो'चा नवा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; तुम्हीही होऊ शकता सामील, जाणून घ्या...