Rajeev Sen, Charu Asopa : टीव्ही विश्वाची प्रसिद्ध जोडी अभिनेत्री चारू असोपा (Charu Asopa) आणि राजीव सेन (Rajeev Sen) त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होती. हे जोडपे कायमचे वेगळे होत असल्याच्या चर्चा सुरु होत्या. एवढेच नाही तर, अभिनेत्री चारू असोपा हिने घटस्फोटाची जाहीर पोस्टही केली होती. मात्र, या सगळ्या ड्रामानंतर आता त्यांनी आपल्याला नात्याला आणखी एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री चारू असोपाने या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. तसेच, त्यांनी एकत्र गणेशोत्सव साजरा करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजीव सेन आणि त्याची पत्नी चारू असोपा (Charu Asopa) यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि ते कायदेशीररित्या वेगळे होत असल्याचे जाहीर केले होते. पण, आता असे दिसतेय की, दोघांमध्ये सर्व काही ठीक आहे. तसेच, दोघांमधील वाद देखील मिटले आहेत. चारू आणि राजीव यांनी पॅचअप केले आहे.


काय म्हणाली अभिनेत्री?


राजीव सेनसोबत घटस्फोट घेत नसल्याचे अभिनेत्रीने एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे जाहीर केले आहे. पोस्ट शेअर करताना तिने लिहिले की, ‘लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात, पण त्या निभावण्याची जबाबदारी आपली आहे. होय, आम्ही दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली होती आणि आम्ही दोघेही हे लग्न संपवणार होतो. आम्हाला वाटले की, आमच्यात सर्व काही संपले आहे आणि आता काहीही उरले नाही. आता घटस्फोट हाच एकमेव मार्ग आहे, असे वाटले. पण, आता आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की, आम्ही दोघेही आमच्या लग्नाला आणखी एक संधी देणार आहोत. आम्ही दोघे मिळून आमची मुलगी जियाना हिचे चांगले संगोपन करणार आहोत. चांगले पालक होणार आहोत. मुलीचे संगोपन हेच आता आमचे पहिले प्राधान्य आहे. आम्ही सर्व चाहत्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी आम्हाला नेहमीच एक जोडी म्हणून पाठिंबा दिला. सर्वांचे आभार! चारू आणि राजीव’.



घटस्फोटाचा हायव्होल्टेज ड्रामा


चारू (Charu Asopa) आणि राजीव (Rajeev Sen) यांनी 9 जून 2019 रोजी रजिस्टर मॅरेज केले. त्यानंतर 16 जून रोजी त्यांचा गोवा येथे विविह सोहळा पार पडला. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चारूने एका मुलीला जन्म दिला होता. झियाना असं त्यांच्या मुलीचं नाव आहे.  दोघेही दररोज बाळासोबतचे फोटो शेअर करत असतात. चारू आणि राजीव यांनी त्यांच्या लग्नातील अडचणी सोशल मीडियावर शेअर केल्या होत्या. राजीवने चारूवर पहिल्या लग्नाचे सत्य लपवल्याचा आरोप केला होता. तर, चारूने राजीवसोबतच्या नात्याला टॉक्सिक म्हटले होते.


हेही वाचा :


Charu Asopa- Rajeev Sen Separation : सुष्मिता सेनच्या भावाचा घटस्फोट? राजीव आणि चारु होणार विभक्त, चर्चांना उधाण