Subodh Bhave : मारठी चित्रपट आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) हा सोशल मीडियावरील सक्रिय असतो. वेगवेगळ्या विषयांवरील पोस्ट तो सोशल मीडियावर शेअर करतो.  सुबोध हा सध्या बस बाई बस या कार्यक्रमामधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सुबोध हा बस बाई बस या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतो. नुतकतीच सुबोधनं पुणे मेट्रोबाबत एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यानं पुणे मेट्रोसाठी काम केलेल्या प्रत्येक व्यक्तीचे आभार मानले आहेत.  


पुणे मेट्रोचं काम बघतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सुबोधची पत्नी मंजिरी देखील दिसत आहे. सुबोधनं त्याचे हे फोटो शेअर करुन त्याला खास कॅप्शन दिलं आहे. कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं,  'मी पहिल्यांदा पुणे ते मुंबई जेव्हा एक्स्प्रेस हायवे नी प्रवास केला तेव्हा मी त्याला नमस्कार करून प्रवासाला सुरवात केली. तो नमस्कार ज्या ज्या व्यक्तींचा तो रस्ता उभारण्यात सहभाग होता त्या सर्व व्यक्तींविषयी कृतज्ञता होती.आज पुणे मेट्रोच काम पाहताना पुन्हा एकदा हीच भावना मनात आली. अत्यंत गुंतागुंतीच्या भागातून ही मेट्रो प्रवास करणार आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अजून सक्षम करण्याच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे.'


सरकारचे मानले आभार
काही काळाने जेव्हा पुणे मेट्रो पूर्ण होईल आणि सर्व मार्ग सुरू होतील तेव्हा यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद "पुणे मेट्रो " शी निगडित सर्वांच्या कष्टाला दिलेली कौतुकाची पावती असेल. "पुणे मेट्रो" शी संबंधित सर्व घटक- केंद्र सरकार, राज्य सरकार ,पुणे महानगरपालिका, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काम करणाऱ्या हजारो व्यक्ती सर्वांप्रती फक्त कृतज्ञता आणि तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.' असंही सुबोधनं पोस्टमध्ये लिहिलं. 


नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
सुबोधनं पुढे पोस्टमध्ये लिहिलं, 'आपल्या मेट्रो मधून प्रवास करणारे शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनी ,ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिक अपंग व्यक्ती यांची आपण विशेष काळजी घ्याल ही अपेक्षा.' 


सुबोधची पोस्ट: 






आणि...डॉ. काशिनाथ घाणेकर, 'कट्यार काळजात घुसली' , लोकमान्य, बालगंधर्व या चित्रपटांमधील सुबोधच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. 


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Kalsutra : जिओ स्टुडिओजच्या थरारक आणि ॲक्शन पॅक वेब शो ‘कालसूत्र’ची घोषणा; सुबोध भावे, सयाजी शिंदे मुख्य भूमिकेत