मुंबई : कॉमेडीकिंग कपिल शर्मा याचा 'द कपिल शर्मा शो' प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला होता. मात्र सोनी वाहिनीवर सुरु असलेल्या या शोचं भवितव्य धोक्यात आल्याचं चित्र आहे. कपिलसोबत 106 कोटींच्या कराराचं नूतनीकरण करण्यास वाहिनीने नकार दिल्याचं वृत्त आहे.

दिग्गज सेलिब्रिटींनी कपिल शर्माच्या शो मध्ये येण्यास नकार दिल्याचंही म्हटलं जातं. त्यामुळे सोनी टीव्ही कपिल शर्मासोबतचा 106 कोटींचा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू करणार नसल्याची चर्चा आहे. सध्याचा करार पुढच्या महिन्यात संपणार असल्याने चॅनेल तो वाढवण्याच्या विचारात नाही.

...म्हणून कपिल शर्मानं विमानातचं सुनिल ग्रोवरला धुतलं


कपिल शर्माने आपला सहकारी सुनील ग्रोव्हरला फ्लाईटमध्ये मारहाण केली होती. त्यानंतर माफी मागूनही सुनील ग्रोव्हर शुटिंगसाठी येत नाही. कपिलच्या वर्तनामुळे अनेक सहकारी कलाकार शो सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे कपिल शर्माच्या शोचं भविष्य धोक्यात आलं आहे.

दरम्यान, डॉ. महशूर गुलाटी ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता सुनील ग्रोव्हर आपला नवा शो घेऊन येत आहे. त्याच्या सोबत आहे बंपर म्हणजेच अभिनेता किकू शारदा. सुनील ग्रोव्हरने ही माहिती ट्विटर अकाऊण्टवरुन दिली आहे.

सुनिल ग्रोव्हरसोबतच्या भांडणावर कपिल शर्माची फेसबुक पोस्ट


एक एप्रिलला दिल्लीत सुनील आणि किकू हे एक लाईव्ह शो करणार आहेत. या शोचं नाव डॉ. मशहूर गुलाटी कॉमेडी क्लिनिक आहे. कपिलसोबतच्या वादानंतर सुनील नवा शो आणणार असल्याची चर्चा असल्याने हा लाईव्ह शो महत्त्वाचा मानला जात आहे.