Bollywood Weddings In 2022: बॉलिवूडमधील अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचा (Katrina Kaif) शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. तसेच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैनचा (Vicky Jain) देखील लग्न सोहळा पार पडला. लवकरच बॉलिवूडमधील काही कपल्स लग्नगाठ बांधणार आहेत, अशी चर्चा आहे. जाणून घेऊयात बॉलिवूडमधील कोणत्या जोड्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे....
रणबीर कपूर आणि आलिया भट (ranbir kapoor and alia bhatt)
रणबीर आणि आलियाचा लग्न सोहळा पार पडणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. या दोघांच्या अफेअरबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू असतात. लवकरच यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. तसेच मौनी रॉय आणि नागार्जुन हे या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर (Malaika Arora and Arjun Kapoor)
अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर ही बॉलिवूडमधील चर्चेत असणारी जोडी आहे. अर्जुन आणि मलायका यांच्या नात्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे फॅन्स नेहमी उत्सुक असतात. 2022 मध्ये हे दोघं लग्नगाठ बांधणार आहेत, अशी चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत अर्जुनने सांगितले होते, 'माझा लग्न करण्याचा निर्णय मी कधीच लपवणार नाही. पण लग्नाबद्दल अजून तरी काही विचार केला नाही आणि केला तरी तो सर्वांना सांगेन, लपवणार नाही.'
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (farhan akhtar and shibani dandekar)
अभिनेता फरहान अख्तर आणि शिवानी दांडेकर हे दोघं लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत, अशी सोशल मीडियावर चर्चा आहे. हे दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंना नेटकऱ्यांची पसंती मिळते.
महत्त्वाच्या बातम्या :
Sunny Leone And Arbaaz Khan : अरबाज खानच्या 'या' प्रश्नाला उत्तर देताना सनी लिओनी भावूक; म्हणाली...