Tejasswi Prakash : छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. सध्या नागिन (Naagin) ही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. या मालिकेत अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) ही प्रमुख भूमिका साकारत आहे. बिग बॉस-15 (Bigg Boss 15) या शोमुळे अभिनेत्री तेजस्वी प्रकाशला विशेष लोकप्रियता मिळाली. बिग बॉसच्या 15 व्या सिझनची ती विजेती ठरली. नुकताच तेजस्वीनं एक गौप्यस्फोट केला आहे. तिनं मालिकेमध्ये काम केल्यानंतर मिळालेल्या मानधनाबाबत एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
मुलाखतीमध्ये तेजस्वीनं सांगितलं, 'तुम्हाला मी माझा वैयक्तिक अनुभव सांगते. मी जेवढ्या मालिकांमध्ये काम केले आहे त्या सर्व मालिकांमध्ये मला हिरोपेक्षा जास्त मानधन मिळालं आहे. मला वाटतं की तुम्ही जसं काम करता तसे पैसे तुम्हाला मिळतात. मी आठ ते नऊ शोमध्ये काम केले आहे. त्यामधील दोन शो सोडले तर मला बाकी शोमध्ये हिरोपेक्षा जास्त पैसे मिळाले. मला असं नाही वात की मुलांनाच फक्त जास्त पैसे मिळतात. '
'खतरों के खिलाडी 10', 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमिडी नाइट्स लाइव्ह', 'कॉमिडी नाइट्स विथ कपिल' आणि 'कॉमिडी नाइट्स बचाओ' यांसारख्या शोमध्ये देखील तेजस्वीनीनं सहभाग घेतला होता.
संबंधित बातम्या
- The Kashmir Files : काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरावर भाष्य करणाऱ्या 'द कश्मीर फाइल्स'चा दुसरा ट्रेलर आऊट
- Bachchan Pandey : अभिषेक बच्चन अन् चंकी पांडेसोबत खास कनेक्शन; असं ठरलं 'बच्चन पांडे' नाव
- Tejasswi Prakash : वजन कमी होते म्हणून लोकांनी ट्रोल केलं होतं, तेजस्वी प्रकाशनं सांगितला अनुभव
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha