Palak Sindhwani TMKOC Controversy : तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या मालिकेतील सोनूची भूमिका साकारणाऱ्या पलक सिंधवानीने निर्मांत्यांवर छळ केल्याचा आरोप केला आहे. पलकने मालिकेच्या निर्मात्यावर मेंटल हॅरेसमेंटचा आरोप केला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका मागील 16 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. पण, या शोच्या निर्मात्यांवर अनेक कलाकारांनी आरोप केले आहे. सोढीच्या पत्नीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्रीने निर्माता असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. जेनिफरने आता पलक सिंधवानीची पाठराखण केली आहे.
या कलाकारांचेही शोच्या निर्मात्यांवर आरोप
पलक सिंधवानी आणि जेनिफर यांच्या आधीही अनेक कलाकारांनी शोच्या निर्मात्यांवर आरोप केले आहेत. काहींनी निर्मात्यांवर त्रास देणे, कामाचे पैसे थकवल्याचा आणि न सांगता शोमधून बाहेर काढल्याचे आरोप केले आहेत. जेनिफरनंतर रिटा रिपोर्टरची भूमिका साकारणारी प्रिया आहुजा राजदा आणि बावरीची भूमिका साकारणारी मोनिका भदोरिया या कलाकारांनीही निर्मात्यांवर गैरवर्तन केल्याचे आरोप केले होते. दीर्घकाळ शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनीही निर्मात्यांना पैसे न दिल्याचा आरोप केला आणि न्यायालयातही धाव घेतली होती.
पलकबद्दल जेनिफर काय म्हणाली?
पलक सिंधवानी असित कुमार मोदीचा शो तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये सोनूची भूमिका करत होती. शो सोडल्यानंतर पलक सिंधवानीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर पलक ने आरोप केला होता की, निर्मात्यांकडून तिला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. पलकने आरोप केला आहे की, तिला निर्मात्यांकडून धमकावलं जात आहे आणि मानसिक त्रास दिला जात आहे.
जेनिफर मिस्त्री पलकच्या समर्थनार्थ
आता पलक सिंधवानीच्या आरोपानंतर जेनिफर मिस्त्री तिच्या समर्थनात पुढे आली आहे. जेनिफर म्हणाली, पलकसोबत सध्या जे काही घडत आहे, ते शोच्या प्रत्येक कलाकारासोबत घडते. ज्याला शोमधून बाहेर काढायचं आहे, त्याच्याशी निर्माते अशाप्रकारे वागतात, असंही तिने याआधीही एका मुलाखतीत सांगितलं होतं. निर्माते कोणालाही सहज शो सोडू देत नाहीत. ती जागा कलाकारांसाठी तुरुंगासारखी आहे. पलक खूप गोंडस आहे आणि मला काळजी वाटते की, निर्मात्यांनी तिला पैसे दिले नसावेत, असंही तिने म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :