Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Asit Kumar Modi :  छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मिसेस सोढी ही व्यक्तीरेखा साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बंसीवाल (Jennifer Mistry Bansiwal) यांच्या बाजूने निकाल लागला आहे. मिस्त्री यांनी मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या आरोपानंतर एकच खळबळ उडाली होती. असितकुमार मोदी यांनी जेनिफर यांची थकित रक्कम आणि पाच लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे निर्देश देण्यात आले. 


'तारक मेहता का उल्टा चष्मा' मध्ये मिसेस सोढीची भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री यांनी असित कुमार मोदी यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणात महाराष्ट्र सरकारच्या मदतीने कारवाई करण्यात आली. जेनिफर मिस्त्रीने यापूर्वी तिच्या बाजूने निकाल देऊनही आरोपीला शिक्षा न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. 'टाईम्स ऑफ इंडिया डॉट कॉम'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


जेनिफर मिस्त्री बन्सीवाल प्रसिद्ध टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील श्रीमती सोढीच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे आणि तिने या शोचे निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाचा आरोप केल्यावर ती प्रकाशझोतात आली. अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने गेल्या वर्षी असित कुमार मोदी, सोहिल रमाणी आणि जतिन रमाणी यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता.


मुंबई पोलिसांकडून तक्रारीवरील कारवाई बाबत कोणतीही माहिती समोर न आल्याने अभिनेत्री जेनिफरने महाराष्ट्र सरकारकडे मदत मागितली होती. स्थानिक तक्रार निवारण समितीची स्थापना केल्यानंतर या प्रकरणातील सुनावणीला वेग आला.  त्यानंतर निर्माते असित कुमार मोदी हे कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ विरोधी कायदा 2013 नुसार, चार महिन्यात दोषी आढळले. 


जेनिफर मिस्त्री बंसीवाल काय म्हणाली?


अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालने या सगळ्या प्रकरणावर आपली संमिश्र भावना व्यक्त केली आहे. निकाल माझ्या बाजूने लागला असल्याचे त्यांनी सांगितले. मी केलेल्या आरोपाच्या पुष्टीसाठी पुरावेदेखील सादर केले. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मालिकेचे निर्माते, असितकुमार मोदी, ऑपरेशन हेड सोहिल रमानी, कार्यकारी निर्माते जतिन बजाज यांच्याविरोधात लैंगिक छळाची तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही कोणतीही हालचाल झाली नाही. त्यानंतर राज्य सरकारकडे मी धाव घेतली. त्यानंतर स्थानिक तक्रार निवारण समिती स्थापन झाली.






जेनिफरने पुढे म्हटले की, असित कुमार मोदी यांना माझ्या कामाची थकित रक्कमेसह नुकसानभरपाई म्हणून अतिरिक्त रक्कम देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. मोदींवर पाच लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. माझ्या कामाचे थकित रक्कम आणि नुकसानभरपाई म्हणून किमान 25-30 लाख रुपये मिळू शकतात असे जेनिफरने सांगितले. 15 फेब्रुवारी 2024 रोजी हा निकाल आला असून त्यानंतर 40 दिवस उलटूनही माझ्या हक्काचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप जेनिफिरने केला.