The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' या छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकेला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.  बॉलिवूडमधील अनेक कलाकार या शोमध्ये येऊन त्यांच्या आयुष्यातील वेगवेगळे किस्से प्रेक्षकांसोबत शेअर करतात. कपिल शर्मा (Kapil Sharma),कृष्णा अभिषेक (Krushna Abhishek),भारती सिंह (Bharti Singh),किकू शारदा (Kiku Sharda)  हे कलाकार त्यांच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. या आठवड्यात तारक मेहता का उल्टा चष्मा  (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील शैलेश लोढा (Shailesh Lodha) हे द कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावणार आहेत. पण कपिल शर्मा शोमध्ये गेल्यानं आता शैलेश यांनी नेटकऱ्यांनी ट्रोल केले आहे. 


काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा यांचा एका कार्यक्रमातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते कपिल शर्मा शोबद्दल बोलत होते. ते म्हणाले होते की, 'मला असा कार्यक्रम पाहिल्यावर लाज वाटते कारण यामध्ये एक आजी लोकांच्या जवळ जाते, तर एक पती आपल्या पत्नीला काहीही बोलतो. मी अशा कार्यक्रमात काम करतो ज्यामध्ये एक मुलगा प्रत्येक वेळी आपल्या वडीलांचा आशीर्वाद घेतो.'






एका नेटकऱ्यांनी शैलेश यांनी ट्रोल करत ट्वीट केले, 'शैलेश सर कपिल शर्मा के शोमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तींना काय सांगणार आहात? त्यांनी शो पाहायचा की नाही?'






संबंधित बातम्या


The Kapil Sharma Show : 'मुंबईत राहतो आणि मराठी बोलत नाही'; सोनालीनं कपिलला सुनावलं


The Kapil Sharma Show : भारती, कृष्णा अन् अर्चना; कपिल शर्मा शोच्या कलाकारांचे मानधन माहितेय?


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha