Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 15 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. या मालिकेत दयाबेन दिसत नसल्याने मालिकाप्रेमी नाराज झाले होते. सहा वर्षांपासून दयाबेन मालिकेतून गायब होती. पण आता मालिकेत पुन्हा एकदा दयाबेनची एन्ट्री होणार आहे. 


गोकुळधाममध्ये दयाबेनची एन्ट्री!


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात दयाबेनच्या कमबॅकबद्दल भाष्य करण्यात आलं होतं. दयाबेन घरी येणार असल्याने जेठालालदेखील खूप आनंदी आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर दयाबेनची गोकुळधाममध्ये एन्ट्री होणार असल्याचं सुंदरने सांगितलं आहे. दयाबेन येणार असल्याने जेठालाल, बाबूजी आणि टप्पूप्रमाणे गोकुळधाम सोसायटीतील सर्व सदस्यदेखील खूप उत्सुक आहेत. पण सुंदर आता खरचं दयाबेनला आणणार की ही फक्त अफवा आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या भागात जेठालाल सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये दयाबेनची वाट पाहताना दिसत आहे. त्यानंतर सुंदरलाल आणि तप्पूचं फोनवर बोलणं होतं. तो म्हणतो पाच मिनिटात दयाबेनला घेऊन गोकुळधाममध्ये येत आहे. दयाबेनच्या स्वागतासाठी सर्वच जण सज्ज आहेत. दरम्यान एक गाडी येते आणि जेठालाल म्हणतो,"टप्पूची आई तुझं स्वागत".


Boycott TMKOC


'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दयाबेनची एन्ट्री न झाल्याने चाहते नाराज झाले आहेत. त्यांनी ही मालिका बॉयकॉट करायला सुरुवात केली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दयाबेनला पुन्हा पाहण्यासाठी चाहते आतुर होते. पण आता ती दिसणार नसल्याने ते नाराज झाले आहेत. 










दिशाने आपला अभिनय, मजेदार संवाद आणि गरबा नृत्याने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेचे प्रेक्षक त्यांच्या लाडक्या ‘दया बेन’ची म्हणजेच अभिनेत्री दिशा वकानीची वाट पाहत आहेत. दिशा बाळाच्या स्वागतासाठी ब्रेकवर गेली होती, त्यानंतर अद्याप ती शोमध्ये परतलेली नाही.


संबंधित बातम्या


TMKOC : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत सहा वर्षांनी होणार दयाबेनची एन्ट्री; गोकुळधाम सोसायटी स्वागतासाठी सज्ज