Munmun Dutta Engagement : तारक मेहता का उल्टा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) चश्मा मालिकेतील बबिता जी (Babita Ji) आणि जेठालालचा लाडका लेक टप्पू (Tappu) यांच्या साखरपुड्याची सध्या चर्चा रंगली आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेतील बबिता जी ही भूमिका साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता (Munmun Dutta) आणि टिपेंद्र जेठालाल गडा उर्फ टप्पूची भूमिका साकारलेला अभिनेता राज अनादकट (Raj Anadkat ) यांचा  साखरपुडा झाल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत. या दोघांनी गुपचूप मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थिती साखरपुडा केल्याचं सांगितलं जात आहे.


बबिता जी आणि टप्पूचा साखरपुड्याची चर्चा


मुनमुन दत्ता आणि राज अनादकट या दोघांनी गुपचूप साखरपुडा उरकल्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. मुनमुन दत्ताचं वय 36 आणि राज अनादकटचं वय 27 वर्ष आहे. सोशल मीडियावर या दोघांनी साखरपुडा केल्याचं सांगितलं जात आहे. काही सोशल मीडिया पोस्टनुसार, राज अनादकट आणि मुनमुन दत्ता यांनी गुजरातच्या वडोदरामध्ये साखरपुडा केल्याची चर्चा आहे. या दोघांच्या फोटो आणि कॅप्शनसह सोशल मीडियावर पोस्टचा जणू महापूरच आला आहे. अनेक लोक पोस्ट शेअर करत आहेत तर, या पोस्टवर कमेंटचाही पाऊस पडला आहे.


मुनमुन दत्ता आणि राज अनादकटने गुपचूप उरकला साखरपुडा?


तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका घराघरात लोकप्रिय आहे. या मालिकेतील भूमिका साकारणारा प्रत्येक कलाकार घराघरात प्रसिद्ध आहे. राज अनादकट उर्फ टपू याने तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेला रामराम केला आहे. मात्र, त्याला या मालिकेमुळे खूप प्रसिद्धी मिळाली आहे. राज अनादकट याने मुनमुन सोबतच्या रिलेशनमुळे मालिका सोडल्याचीही सोशल मीडियावर चर्चा होती.


या दोघांबाबत पोस्ट व्हायरल


राज अनादकट आणि मुनमुन दत्ता यांचं नाव गेल्या काही काळापासून एकमेकांसोबत जोडलं जात आहे. टप्पू उर्फ राज अनादकटने मुनमुन दत्ता म्हणजेच बबितामुळे मालिका सोडल्याचीही चर्चा होती. आता पुन्हा एकदा या दोघांबाबत पोस्ट व्हायरल होत असून त्यामध्ये या दोघांनी साखरपुडा केल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, यामागचं नेमकं सत्य काय असा प्रश्ना अनेकांना पडला आहे. हाच प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर यामागचं सत्य येथे जाणून घ्या.


बबिता आणि टप्पू कायम चर्चेत


तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील बबिता उर्फ मुनमुन दत्ताचे नाव टप्पू ही भूमिका साकारणारा राज अनादकट यांचे नाव एकमेकांसोबत जोडले गेले. त्या दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत, असं म्हटलं जात होतं. पण ही केवळ अफवा असल्याचं मुनमुनने या आधीदेखील सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं.


सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल






 






 






 


यामागचं सत्य काय?


आता मुनमुन दत्ता आणि राज अनादकट या दोघांच्या साखरपुड्याच्या चर्चांवरही राज अनादकटने मौन सोडलं आहे. राज अनादकट उर्फ टप्पूने मुनमुन दत्ता सोबतच्या साखरपुड्याच्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. राज अनादकटने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत लिहिलं आहे की, ''नमस्कार, फक्त गोष्टी स्पष्ट करण्यासाठी, तुम्ही सोशल मीडियावर पाहत असलेल्या बातम्या खोट्या आणि निराधार आहेत.'' मुनमुनसोबत साखरपुडा झाल्याच्या बातम्या खोट्या असल्याचं राज अनादकटने म्हटलं आहे.