Swayamvar: Mika Di Vohti : प्रसिद्ध गायक मिका सिंहच्या (Mika Singh) गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळते. लवकरच मिका विवाहबंधनात अडकणार आहे. 'स्टार भारत'च्या 'स्वयंवर: मिका दी वोटी' (Swayamvar: Mika Di Vohti) या शोमधून मिका आपली आयुष्यभराची जोडीदार निवडणार आहे. 19 जूनपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या कार्यक्रमाच्या एका एपिसोडमध्ये अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी (Divyanka Tripathi) हजेरी लावली.
मिकानं शेअर केला व्हिडीओ
मिकानं 'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिव्यांका ही स्पर्धेतील मुलींना 'स्पिड-डेटिंग' च्या टिप्स देताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करुन मिकानं त्याला कॅप्शन दिलं, 'मी स्पिड डेटिंगबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. पण दिव्यांका या माझ्या मैत्रिणीनं सर्वांना स्पिड डेटिंगबाबत सांगितलं.' स्पिड डेटिंगबाबत ऐकताच स्वयंवरातील काही मुली या आश्चर्यचकित झाल्या तर काही आनंदी झाल्या. स्पिड डेटिंग या टास्कमुळे आता मिकाच्या स्वयंवरात कोणता ट्वीस्ट येईल? हे लवकरच प्रेक्षकांना समजणार आहे.
पाहा व्हिडीओ:
पहिल्याच दिवशी स्वयंवरात झालं होतं भांडण
नीत आणि बुशरा यांच्यामध्ये स्वयंवराच्या पहिल्याच दिवशी भांडण झालं. एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नीत ही बुशरा म्हणते, 'गेम ही नेहमी आपल्या लेव्हलच्या खेळाडूसोबत खेळावा.' यावर बुशरा म्हणते, 'मिका सिंह ट्रोफी नाहीये, इथे तू काय जिंकायला आणि हरायला आली आहे?' यावर नीत म्हणते, मी इथे कोणालाच माझा स्पर्धक मानत नाही. त्यानंतर बुशरा म्हणते, 'ये तो सच में सस्ती वाली कटरीना कैफ है' हे ऐकून मिका देखील थक्क होतो.
'स्वयंवर मिका दी वोटी' या कार्यक्रमात एकूण 12 मुली सहभागी झाल्या आहेत. देशभरातील विविध भागामधून या मुली स्वयंवरासाठी आल्या आहेत. 45 वर्षीय मिका सिंह 12 मुलींमधून एकीची निवड करणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशातील विविध कानाकोपऱ्यातून मुली आल्या आहेत. 12 मुलींमधून मिका जोडीदार म्हणून कोणाची निवड करणार, हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे. 12 मुलींपैकी मिका लग्नासाठी कोणत्या मुलीची निवड करेल? या प्रश्नाचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे. मिका हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक आहे. त्याच्या 'पार्टी तो बनती है', 'सुबह होने न दे', 'रानी तू मैं राजा' या गाण्यांमुळे मिकाला विशेष लोकप्रियता मिळाली.
हेही वाचा :