Sumona Chakravarti Birthday : 'द कपिल शर्मा शो'मध्ये ‘भुरी’ची भूमिका करणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती (Sumona Chakravarti) आज (24 जून) आपला वाढदिवस साजरा करत आहे. सुमोनाने वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. 'द कपिल शर्मा शो'मध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमोना चक्रवर्ती आज 34 वर्षांची झाली आहे. सुमोना गेल्या अनेक वर्षांपासून कपिलच्या शोचा एक भाग आहे. कपिल शर्माच्या शोमध्ये येण्यापूर्वी आपण सुमोनाला अनेक रिअॅलिटी शोमध्ये पाहिले आहे.


1999मध्ये आलेल्या आमिर खान आणि मनीषा कोईराला स्टारर 'मन' या चित्रपटातून सुमोना चक्रवर्तीने अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली होती. या चित्रपटात सुमोनाने नेहा नावाच्या शालेय विद्यार्थिनीची भूमिका साकारली होती. मात्र यानंतर ती मालिकांकडे वळली. तिने अनेक मालिकांमधून छोट्या मोठ्या भूमिका केल्या. पण तिला खरी ओळख ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेमुळे मिळाली.


कपिल शर्मासोबत जमली जोडी!


सुमोना चक्रवर्तीचा पडद्यावरचा आतापर्यंतचा प्रवास खूपच रंजक राहिला आहे. 'बडे अच्छे लगते हैं' या टीव्ही मालिकेनंतर सुमोनाने सोनी टीव्हीच्या 'कहानी कॉमेडी सर्कस की' या कॉमेडी शोमध्ये कपिल शर्मासोबत भाग घेतला होता. या शानदार केमिस्ट्री आणि कॉमेडी टायमिंगमुळे कपिल आणि सुमोना यांनी हा शो जिंकला. त्यानंतर जून 2013 ते 2017 या काळात हे दोघे 'कॉमेडी नाईट्स विथ कपिल'मध्ये पुन्हा एकत्र दिसले. यानंतर कपिल शर्माने पुन्हा सोनी टीव्हीवर 'द कपिल शर्मा शो' नावाचा नवीन शो सुरू केला, ज्यामध्ये सुमोनाने ‘सरला गुलाटी’ची भूमिका साकारली होती.


त्यानंतर सुमोनाने कपिलसोबत त्याच्या कॉमेडी शोमध्ये काम केले. पहिल्या सीझनमध्ये ती कपिलच्या बायकोची तर, दुसऱ्या सीझनमध्ये ती कपिलची शेजारी सरला आणि आता भुरीची भूमिका करत आहे. 'द कपिल शर्मा शो'ने तिची लोकप्रियता खूप वाढवली आहे.


चित्रपटांमध्येही केलेय काम


रिपोर्ट्सनुसार, सुमोना एका एपिसोडसाठी तब्बल 2-3 लाख रुपये घेते. सुमोनाच्या मनात अजूनही सल आहे की, तिला इंडस्ट्रीत फारसे चांगले काम केले नाही. एका मुलाखतीत तिने असेही म्हटले होते की, तिला चांगले काम मिळणे कठीण जात आहे आणि ती लोकांकडे कामासाठी विचारणा करत आहे. सुमोनाने रणबीर कपूर आणि प्रियांका चोप्रा स्टारर 'बर्फी' आणि सलमान खानच्या 'किक'मध्ये छोट्या भूमिका केल्या होत्या.


हेही वाचा :


Entertainment News Live Updates 24 June : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!


Biopics On Cricketers : एम. एस धोनी ते चकदा एक्सप्रेस; क्रिकेटर्सचं आयुष्य रुपेरी पडद्यावर उलगडणारे चित्रपट


Thipkyanchi Rangoli : ठिपक्यांची रांगोळी मालिकेत नवा ट्विस्ट; अभिनेत्री वीणा जगतापची होणार एन्ट्री