Suvrat Joshi: अभिनेता सुव्रत जोशीनं (Suvrat Joshi) मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. ताली या आगामी हिंदी वेब सीरिजमध्ये सुव्रतनं काम केलं आहे. सुव्रतच्या आगामी वेब सीरिज आणि चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. एका मुलाखतीमध्ये सुव्रतनं त्याच्या बालपणीचा एक आठवण सांगितली. 


सुव्रत जोशीनं सांगितला किस्सा


सुलेखा तळवलकर यांच्या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुव्रत जोशीनं  सांगितलं, "मला लहानपणापासून पु.ल. देशपांडे आवडायचे. मी नववीत असतानाचा हा किस्सा आहे. जेव्हा पु.ल आजारी पडले तेव्हा माझे वडील माझ्या आईला सांगत होते की, पु.ल देशपांडे यांची तब्येत बिघडली आहे.मी तेव्हा माझ्या वडिलांना म्हटलं होतो, काय टेंशन घ्यायचं नाही, सु.ल आहेत ना. माझ्या वडिलांनी हा किस्सा माझ्या कॉलेजच्या मित्रांना सांगितला. त्यानंतर माझे मित्र मला सु.ल म्हणत होते. माझ्या वडिलांचे नाव लक्ष्मण आहे."


सुव्रतनं या चित्रपटांमध्ये केलं काम


सुव्रतनं शिकारी, पार्टी, मन फकिरा, अनन्या आणि गोष्ट एका पैठणीची या मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच त्यानं  IB 71 या हिंदी चित्रपटामध्ये देखील भूमिका  साकारली. दिल दोस्ती दुनियादारी आणि दिल दोस्ती दोबारा या मालिकांमुळे सुव्रतला विशेष लोकप्रियता मिळाली. आता सुव्रतची ताली ही वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.






2019 मध्ये सुव्रतनं अभिनेत्री सखी गोखलेसोबत (Sakhi Gokhale) लग्नगाठ बांधली. सुव्रत आणि सखी यांनी दिल दोस्ती दुनियादारी आणि दिल दोस्ती दोबारा या मालिकांमध्ये एकत्र काम केलं.सुव्रत आणि सखी हे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. त्यांच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळते.सुव्रत हा सोशल मीडियावर त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देत असतो. त्याला इन्स्टाग्रामवर 139K फॉलोवर्स आहेत.






वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Goshta Eka Paithanichi: मंत्रालयातील महिलांसाठी 'गोष्ट एका पैठणीची'चे स्पेशल स्क्रिनिंग; सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती