Suruchi Adarkar: मराठमोळी अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) ही काही दिवसांपूर्वी अभिनेता पियुष रानडेसोबत (Piyush Ranade) लग्नबंधनात अडकली. सुरुचीच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. सुरुचीला का रे दुरावा या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. सुरुचीच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. आता सुरुचीची 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satvya Mulichi Satavi Mulgi) या मालिकेत एन्ट्री झाली आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच सुरुचीनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या प्रोमोमधील सुरुचीच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सुरुचीचा खतरनाक लूक
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत सुरुची ही नागीणीची भूमिका साकारत आहे. "नेत्रा रुपालीमधला शक्तीशाली विरोचक अजूनही पूर्ण जागा नाहीये पण तुला आणि तुझ्या कुटुंबाला संपवण्यासाठी विरोचकाची ही सावलीच पुरेशी आहे.येतीये मी...लवकरच...", हा सुरुचीचा डायलॉग 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेच्या प्रोमोच्या सुरुवातीला ऐकू येतो. प्रोमोमध्ये नेत्रा ही नागीणीच्या येण्यानं घाबरली आहे, असं दिसत आहे.
पाहा प्रोमो:
सुरुची म्हणते, "ही माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग भूमिका आहे"
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुरुचीनं सांगितलं,"ही माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग भूमिका आहे. कारण आतापर्यंत मी खूप साध्या भूमिका साकारल्या आहेत. मी या मालिकेत नागीणीची भूमिका साकारत आहे. माझ्या दोन-तीन लूक टेस्ट झाल्या." आता नागीणीच्या एन्ट्रीनंतर नेत्रा आणि तिच्या कुटुंबाच्या आयुष्यात कोणते नवे संकट येणार? हे मालिकेच्या आगामी एपिसोडमधून प्रेक्षकांना कळणार आहे. तितीक्षा तावडे, अजिंक्य ननावरे आणि ऐश्वर्या नारकर हे कलाकार 'सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत महत्वाची भूमिका साकरतात.
कार रे दुरावा मालिकेमुळे सुरुचीला मिळाली विशेष लोकप्रियता
सुरुचीला का रे दुरावा या मालिकेमुळे विशेष लोकप्रियता मिळाली. ही मालिका 2014 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत सुरुचीनं अदिती ही भूमिका साकारली होती. तर सुयश टिळकनं या मालिकेत जयराम ही भूमिका साकारली होती. या मालिकेतील जयराम आणि अदिती या जोडीली प्रेक्षकांची पसंती मिळाली.
संंबंधित बातम्या: