अस्मिता-अभिची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यामुळे खऱ्या आयुष्यातही त्यांचं लग्न व्हावं, अशी अनेक चाहत्यांची इच्छा होती. या दोघांचा साखरपुडा झाल्याने चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. मयुरी आणि पियुष पुढील वर्षी विवाहबंधानात अडकतील. महत्त्वाचं म्हणजे पियुष रानडेचं हे दुसरं लग्न आहे. शाल्मली टोळ्ये ही त्याची पहिली पत्नी होती.
'अस्मिता' मालिकेत काम करताना पियुष आणि माझी ओळख झाली. दोन वर्षांपासून आम्ही एकत्र काम करत आहोत. आम्ही चांगले मित्र बनलो. कोणतीही गोष्ट, सिक्रेट, सुख-दु:ख शेअर करु शकतो. पडद्यावरील आमची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते आणि ती प्रत्यक्षातही असावी, अशी इच्छा चाहत्यांनी आमच्यासमोर बोलून दाखवली. आम्ही चांगले मित्र आहोत, त्यामुळे एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य घालवू शकतो, असं वाटलं. याबाबत घरच्यांसोबत चर्चा केली, त्यांनीही आनंदाने मान्यता दिली, असं मयुरी वाघने एका वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.
मालिका किंवा चित्रपटात एकत्र काम करताना कलाकार एकमेकांच्या प्रेमात पडल्याची अनेक उदाहरणं आहे. उमेश कामत-प्रिया बापट, आदिनाथ कोठारे-उर्मिला कानिटकर, तेजश्री प्रधान-शशांक केतकर हे एकत्र काम करताना एकमेकांच्या प्रेमात पडले होते.