Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi New Season) विजेता अवघ्या काही तासांमध्ये कळणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये टॉप 6 स्पर्धक हे ग्रँड फिनालेमध्ये पोहचले आहेत. निक्की तांबोळी (Nikki Tamboli), अभिजीत सावंत (Abhijeet Sawant), धनंजय पोवार (Dhananjay Powar), अंकिता वालावलकर (Ankita Walavalkar), जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) आणि सूरज चव्हाण (Suraj Chavan) हे स्पर्धक ग्रँड फिनालेमधेये पोहचले आहेत. पण आत ग्रँड फिनालेमध्ये पोहचलेल्या स्पर्धकांच्या मानधनाची चर्चा सुरु झालीये. त्यामध्ये सूरजच्या मानधनाने विशेष लक्ष वेधून घेतलंय.


पहिल्या दिवसापासून सूरजचं घरातील वागणं, त्याचा स्वभाव, त्याची खेळाडू वृत्ती या सगळ्याच गोष्टींचं कौतुक होत होतं. त्यामुळे सूरजनेच जिंकावं अशी अनेकांची इच्छा आहे. असं असलं तरी सूरजला बिग बॉसच्या घरात अवघ्या काही हजारांचं मानधन देण्यात आल्याच्या चर्चा आहेत. त्यातच ज्या निक्कीचा अनेकांनी रागराग केला तिने मात्र या सीझनसाठी सर्वाधिक मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय. 


सूरजचं मानधन किती?


सूरज जेव्हा बिग बॉसच्या घरात आला, तेव्हा तो अवघ्या 25 हजारांच्या मानधनावर यायला तयार झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सूरजला दर दिवसाला केवळ 3,500 रुपये देण्यात येत असल्याचं म्हटलं जातंय. घरातील प्रत्येक स्पर्धकानेही सूरजच्या खेळाचं कौतुक केलं. तसेच त्यानेच ही ट्रॉफी जिंकावी असंही मत अनेकांनी व्यक्त केलं. पण आता त्याच्या मानधनाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. 


निक्कीने घेतलं सर्वाधिक मानधन


मिडिया रिपोर्ट्नुसार, निक्की तांबोळी ही बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनची सर्वात महागडी स्पर्धक असल्याचं म्हटलं जातंय. तसेच निक्कीला प्रत्येक आठवड्यासाठी जवळपास 3 लाख 75 रुपये इतकं मानधन देत असल्याचं सांगण्यात येत आहे. याचाच अर्थ निक्कीने दहा आठवड्यांचे जवळपास 37 लाख 50 रुपये इतकं मानधन घेतलं आहे.         


इतर कलाकारांचं मानधन किती?


या सीझनमध्ये अभिजीत सावंतला दर आठवड्यासाठी 3 लाख 50 हजार रुपये इतकं मानधन मिळत असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे अभिजीत या सीझनमधील निक्कीनंतर दुसरा महागडा स्पर्धक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर वर्षा उसगांवकर यांनी आठवड्यासाठी अडीच लाख रुपये इतकं मानधन घेतलं असल्याची माहिती समोर येत आहे.


निखिल दामले सव्वा लाख रुपये, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर या दोघी जणी प्रत्येक आठवड्याला प्रत्येकी एक लाख रुपये इतकं मानधन घेत असल्याचं सांगण्यात आलं. वैभव चव्हाण 70 हजार रुपये, आर्या जाधव एक लाख रुपये, छोटा पुढारी 50 हजार, धनंजय पोवार 60 हजार, अंकिता वालावलकर 50 हजार, आणि पुरुषोत्तम दादा पाटील यांना 1 लाख 35 हजार इतकं मानधन देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.  


ही बातमी वाचा : 


Kedar Shinde : बिग बॉसचा खेळ 70 दिवसांतच आटोपला; केदार शिंदे म्हणाले, काही निर्णय...