Suraj Chavan about his Love Life : बारामतीच्या सूरजने (Suraj Chavan) बिग बॉसची (Bigg Boss Marathi New Season) ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे सोशल मीडिया, राजकीय, कला क्षेत्र सगळीकडे सध्या फक्त एकाच नावाची चर्चा सुरु आहे. अनेक मुलाखतींच्याही माध्यमातून सूरज त्याची कृतज्ञता व्यक्त करत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आता त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी देखील भाष्य केलंय.                    


सूरजने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बिग बॉसच्याही घरात वारंवार चर्चा केलीये. तसेच त्याला एका मुलीने कसं फसवलं आणि त्यानंतर त्याची अवस्था काय झाली होती याविषयीही त्याने घरातल्या इतर सदस्यांना सांगितलं आहे. पण आता जर तीच मुलगी त्याच्या आयुष्यात पुन्हा आली तर सूरज काय करणार याविषयीही त्याने सांगितलंय. 


सूरज आता नवीन पिल्लू शोधणार....


टिव्ही 9 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सूरजने याविषयी भाष्य केलंय. तुला आता ट्रॉफी मिळाली, सिनेमा मिळाला, प्रसिद्धी मिळाली आता तुझा बच्चा जर तुझ्याकडे परत आला तर तिला स्वीकारशील का? त्यावर सूरजने म्हटलं की, नाही आता बच्चा नाही, बच्चाला आता बच्चा झालाय. आता कसं करणार..आता नाही करु शकत...आता नवीन बघायचं.. साध सिंपल माझं पिल्लू...एक नंबर क्वॉलिटी...


सूरजने काय म्हटलं?


सूरजने जिंकल्यानंतर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी कलर्स मराठीचे मनापासून आभार.. मला अभिमान आहे की, मी बिग बॉसची ट्रॉफी मीच जिंकणार.. मी म्हटलं होतं की, बिग बॉसची ट्रॉफी मीच जिंकणार आणि ती आपल्या झापुक झुपुक पॅटर्नमध्ये घरी घेऊन जाणार... ही ट्रॉफी मला माझ्या आईवडिलांमुळे आणि बिग बॉसमुळे मिळाली आहे.मला माझं घर बांधायचं आहे, तर त्यासाठी मी हे पैसे घालवणार आहे. ही लक्ष्मी मी माझ्या घरासाठी देणार आहे.


सूरजला काय काय मिळालं?


बिग बॉसचा अंतिम विजेता ठरल्यानंतर सूरज चव्हाणला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस म्हणून 14 लाख रुपयांचा चेक देण्यात आला. त्यानंतर या कार्यक्रमाचे स्पॉन्सर पु. ना. गाडगीळ यांच्याकडून सूरज चव्हाणला 10 लाख रुपये जाहीर करण्यात आले. तसेच त्याला एक इलेक्ट्रिक बाईकही बक्षीस म्हणून देण्यात आली आहे.  


ही बातमी वाचा : 


Suraj Chavan : लक्ष्मी मिळाली, बक्षीसाच्या पैशातून घर बांधणार, घराला बिग बॉसचे नाव देणार, सूरज चव्हाणची कृतज्ञता