Nikki Tamboli : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi Season 5) ट्रॉफीवर सूरजने (Suraj Chavan) नाव कोरलं आणि चर्चांना उधाण आलं. सोशल मीडियावरही त्याच्या विजयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्याचं पाहायला मिळतंय. सूरजच्या विजयावर अगदी राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया उमटत असल्याचं चित्र आहे. बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या स्पर्धकांनीही सूरजचं अभिनंदन केलं. पण निक्कीने मात्र तिची बडबड सुरुच ठेवली असल्याचं पाहायला मिळतंय.                                                 

  


बिग बॉसच्या टॉप 6 स्पर्धकांमध्ये बाजी मारत सूरजने बिग बॉसची ट्रॉफी जिंकली. तसेच निक्की तांबोळी ही टॉप 3 मध्ये येऊन तिला घरातून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर निक्कीने इन्स्टाग्रामवर तिच्या ब्रॉडकास्ट चॅनलवरुन तिच्या चाहत्यांसाठी एक मेसेज शेअर केलाय. ट्रॅाफी जरी त्याच्याकडे असली तरीही धमाका माझ्याच नावाचा सुरु असल्याचं निक्कीने म्हटलं आहे.                              


निक्कीने काय म्हटलं?


निक्कीने म्हटलं की, हॅलो, मी निक्की तांबोळी. तुम्हाला सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की, तुम्हाला मला एवढी मतं दिलीत त्यासाठी खूप आभार.. तुम्हीच मला बिग बॉस मराठीचं सेकंड रनर अप केलंत. या सीझनमध्ये मी तुमचं मनापासून मनोरंजन केलंय. तुम्हीच माझे डायलॉग एवढे फेमस केलेत. यापुढेही मी असंच काम करत राहीन.. माझ्या नवीन प्रोजेक्टविषयीही मी तुम्हाला माहित देत राहीन.. माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना खूप खूप प्रेम... आय लव्ह यू.. तुम्हा सगळ्यांसाठी बाई... हा काय प्रकार...


पुढे तिने सूरजच्या विजयावर बोलताना निक्कीने एक खास मेसेज तिच्या चाहत्यांसाठी शेअर केलाय. यामध्ये तिने म्हटलं की, ट्रॉफी जरी त्याच्याकडे असली तरीही धमाका फक्त माझ्याच नावाचा सुरु आहे. तुम्हाला काय वाटतं खरं कोण जिंकलं असेल..? 






ही बातमी वाचा : 


Bigg Boss 18 : महाराष्ट्रातील मराठा आरक्षण हटवण्यासाठी कोर्टात लढलो, बिग बॉसच्या घरात गुणरत्न सदावर्तेंनी स्वत:ची ओळख सांगितली!