Sur Nava Dhyas Nava : केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी रसिक श्रोते ज्याची चातकासारखी वाट पहात असतात तो रसिकजनांच्या हृदय सिंहासनावर अधिराज्य गाजवणारा… मराठी संगीत रिॲलिटी शोमधील ‘मेरूमणी’ अर्थात कलर्स मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि दर्जेदार कार्यक्रम 'सूर नवा ध्यास नवा - पर्व गाण्याचे मराठी बाण्याचे' (Sur Nava Dhyas Nava) हे ब्रीद समोर ठेवून आपलं पाचवं लखलखतं पर्व घेऊन अवतरत आहे. 


सुरांची मैफिल सजणार


15 ते 35 वयोगटातील या महत्त्वपूर्ण पर्वात फक्त महाराष्ट्रातूनच नाही तर सिंगापूर, नेपाळ, इंदूर, भोपाळ, दिल्ली अशा भाषा, प्रांत, देश यांच्या सीमा पार करत सुमारे पाच हजार स्पर्धकांनी या मंचावरून आपलं सुरांचं नशीब आजमावण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्यातून विविध चाचणी फेऱ्यांची कसोटी पार करत सुरेल 16 स्पर्धक आपल्या सुरांचा कस लावण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. आता दर शनिवार आणि रविवारी रात्री साडे नऊ वाजता सुरांची ही खास मैफिल कलर्स मराठीवर सजणार आहे. 






'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमाची बलस्थाने कोणती?


'सूर नवा ध्यास नवा' या स्पर्धेने आपले वेगळेपण जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. फक्त परीक्षकाच्या भूमिकेतून नाहीतर निर्मात्याच्या भूमिकेतून कार्यक्रमाला लोकप्रिय करण्यासाठी जीव ओतणारे महाराष्ट्राचे जोशिले रॉकस्टार गायक आणि लाडके संगीतकार अवधूत गुप्ते. तसंच शास्त्रीय संगीत नव्या पिढीत रूजवण्याचा आणि ते जगभर पसरवण्याचा ध्यास घेतलेले राष्ट्रीय पुरस्कार विजेते शास्त्रीय गायक महेश काळे ही या कार्यक्रमाची अत्यंत महत्वाची बलस्थाने आहेत. 


संगीत आणि महाराष्ट्राचे अतूट नाते असे म्हंटले जाते आणि म्हणूनच या पर्वामध्ये मराठी बाण्याचा नजराणा आणला आहे. महाराष्ट्राच्या मातीतून अनेक दर्जेदार गायक आजवर आपल्याला मिळाले, ज्यांनी सादर केलेली गाणी आजवर आपल्या स्मरणात आहेत. त्याच संगीताला पुन्हाएकदा ऐकण्याची सुवर्णसंधी आपल्याला सूर नवा ध्यास नवाच्या मंचाद्वारे मिळणार आहे. 


संबंधित बातम्या


Movie Release This Week : 'शमशेरा' ते 'अनन्या'; शुक्रवारी प्रदर्शित होणार बिग बजेट सिनेमे


Aaryan Khan : एनसीबीकडून क्लीन चिट मिळालेला आर्यन खान मित्रांसोबत करतोय पार्टी; क्लबमधील व्हिडीओ व्हायरल