Movie Release This Week : सिनेसृष्टीत सध्या आनंदाचे वातावरण आहे. नवनवीन विषयांवरचे सिनेमे (Movie) दर शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. हा शुक्रवारदेखील सिनेप्रेमींसाठी खास असणार आहे. या शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे. येत्या शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर रणबीर कपूरच्या 'शमशेरा' आणि रजत कपूरच्या 'आरके' सिनेमाची टक्कर होणार आहे. जाणून घ्या या शुक्रवारी कोणते सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार...


सिनेमाचे नाव : शमशेरा
कधी रिलीज होणार : 22 जुलै


गेल्या अनेक दिवसांपासून रणबीर कपूर त्याच्या आगामी 'शमशेरा' सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रणबीर गेल्या अनेक दिवसांनी रुपेरी पडद्यावर मोठ्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या सिनेमात रणबीर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. तर संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून रणबीर आणि वाणी कपूरची जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे. हा सिनेमा येत्या शुक्रवारी 22 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.


सिनेमाचे नाव : आरके
कधी होणार रिलीज : 22 जुलै


रजत कपूरचा 'आरके' सिनेमादेखील 22 जुलैला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात रजत कपूरसह मल्लिका शेरावत, रणवीर शौरी आणि कुब्रा सैतदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मल्लिका अनेक वर्षांनी रुपेरी पडद्यावर कमबॅक करत आहे. त्यामुळे प्रेक्षकदेखील या सिनेमासाठी उत्सुक आहेत. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा रजत कपूरने सांभाळली आहे. 


सिनेमाचे नाव : अनन्या
कधी होणार रिलीज : 22 जुलै


'अनन्या' या मराठी सिनेमाची प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. या सिनेमात हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे. हृता या सिनेमाच्या माध्यमातून सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या सिनेमाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा प्रताप फड यांनी सांभाळली आहे. या सिनेमाच्या पोस्टर, टीझर आणि ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. 


सिनेमाचे नाव : थॅंक्यू
कधी होणार रिलीज : 22 जुलै


दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्यचा 'थॅंक्यू' हा सिनेमा 22 जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन दाक्षिणात्य दिग्दर्शक विक्रम कुमारने केले आहे. या सिनेमात नागा चैतन्य व्यतिरिक्त अविका गौर आणि मालविका नायर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 


सिनेमाचे नाव : पाव्स ऑफ द फ्यूरी : द लेजेंड ऑफ हॅक
कधी होणार रिलीज : 22 जुलै


'पाव्स ऑफ द फ्यूरी : द लेजेंड ऑफ हॅक' हा सिनेमा 15 जुलैला यूएसमध्ये रिलीज झाला होता. आता या सिनेमा भारतात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. हा अॅनिमेटेड सिनेमा 22 जुलै 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात मायकल सेरास सैमुअल एल जॅक्सन आणि रिकी गेरवाइस मुख्य भूमिकेत आहेत. 


संबंधित बातम्या


Tehran : जॉनच्या 'तेहरान'मध्ये मानुषी छिल्लरची एन्ट्री; लूकनं वेधलं लक्ष


TDM : कॉमेडीचा बुस्टर डोस, 'ख्वाडा', 'बबन' चित्रपटाच्या यशानंतर भाऊराव कऱ्हाडेंचा 'टीडीएम' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला!