Aaryan Khan : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानची (Aaryan Khan) ड्रग्ज प्रकरणातून सुटका झाली. या प्रकणामुळे आर्यन खान चर्चेत होता. पण आता आर्यनचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे आर्यन खान पुन्हा चर्चेत आला आहे. आर्यन खानचा नाइटक्लबमधील व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अनेक नेटकऱ्यांनी या व्हिडीओला कमेंट्स केल्या आहेत.
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एका नाईटक्लबमध्ये आर्यन पार्टी करत आहे. व्हिडीओमध्ये तो तोंडावरचा मास्क काढून ड्रिंक करताना दिसत आहे. आर्यनच्या आजूबाजूला बरेच लोक दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये आर्यन ब्लॅक शर्ट आणि तोंडावर मास्क अशा लूकमध्ये दिसत आहे. आर्यन खानच्या फॅन पेजवरुन शेअर करण्यात हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक नेटकरी या व्हिडीओला लाइक आणि कमेंट्स करत आहेत.
नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स
एका नेटकऱ्यानं हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला. या व्हिडीओवर एका युझरनं कमेंट केली, 'ही सध्याच्या तरुण पिढीची लाईफस्टाईल आहे. यामध्ये नवं काहीच नाही. तो त्याचं आयुष्य जगतोय. त्याला जे हवं तो ते करेल.' तर दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंट केली, 'हा सुधरणार नाही'
पाहा व्हिडीओ:
मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर 3 ऑक्टोबर 2021 रोजी एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आले होते. त्यात सुपरस्टार शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह अन्य 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. त्यानंतर आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली.
हेही वाचा :