Sundara Manamadhe Bharli: सुंदरा मनामध्ये भरली (sundara manamadhe bharli)  या छोट्या पडद्यावरील मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या मालिकेमध्ये अभिनेत्री अक्षया नाईक  (Akshaya Naik) आणि अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjape) हे कलाकार प्रमुख भूमिका साकारतात. अक्षया आणि समीर यांच्या मालिकेमधील केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले. अक्षया नाईक ही या मालिकेमध्ये लतिका ही भूमिका साकारते. नुकत्याच एका पुरस्कार सोहळ्यातील  'स्फूर्तीदायक व्यक्तीरेखा स्त्री' या कॅटेगिरीमधील  अक्षयाला पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार जिंकल्यानंतर अक्षयानं प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.


अक्षया नाईकनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या हातात ट्रॉफी दिसत आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया म्हणते, 'हा पुरस्कार माझ्यासाठी खास आहे. लॉकडाऊनमध्ये ही मालिका सुरु झाली. अनेकवेळा सीरिअलमधील हिरोईनकडे एका चौकटीत विचार करुन बघितलं जातं. पण आमच्या मालिकेमुळे आम्ही ही विचारांची चौकट मोडली. माझ्यासारख्या अनेक मुलींना तसेच मुलांना सुद्धा आमच्या मालिकेमुळे मला इनस्पायर करता आलं, यासाठी मी मालिकेच्या टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानते. प्रेक्षकांमुळे मला दरवेळी काहीतरी नवीन करायला मिळतं.  खऱ्या आयुष्यात जी गोष्ट जमली नाही ती मला मलिकेत करता आली. मला रनिंग करायला आवड नाही पण मालिकमुळे मी शर्यतीत पळाले. मला ड्रायव्हिंग येत नाही. पण मी मालिकेत ट्रक चालवला. ही प्रेरणा मला मालिकेमुळे मिळाली. '


पाहा व्हिडीओ: 






अक्षयानं शेअर केलेल्या या व्हिडीओला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.  अक्षयानं शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अक्षया ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 


काही दिवसांपूर्वी अक्षया नाईकनं एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अक्षया ही ट्रक चालवताना दिसत होती. या व्हिडीओला तिनं कॅप्शन दिलं, 'मी संपूर्ण टीमचे आभार मानते, नेहमीच काहितरी नवीन आणि challenging करायला मिळतं.'


वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 


Sundara Manamadhe Bharli: 'सुंदरा मनामध्ये भरली'मधील लतिकानं चालवला ट्रक; व्हिडीओ व्हायरल