Kaun Banega Crorepati: छोट्या पडद्यावरील कौन बनेगा करोडपती-14 (Kaun Banega Crorepati-14) या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या सिझनच्या एपिसोडमध्ये भारतातील वेगवेगळ्या भागामधील स्पर्धकांनी सहभाग घेतला. कौन बनेगा करोडपतीच्या प्रत्येक सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता लवकरच या कार्यक्रमाचा नवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कौन बनेगा करोडपती-15 (Kaun Banega Crorepati-15) चा मजेशीर प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. या प्रोमोमध्ये  अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे या कार्यक्रमाच्या रजिस्ट्रेशनबाबत माहिती देताना दिसत आहेत. 


सोनी चॅनलच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन कौन बनेगा करोडपती-15 चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  एक मुलगी आपल्या घराच्या बाहेर एक भूयारी मार्ग तयार करते. या भूयारी मार्गातून ती थेट केबीसीच्या स्टेजवर पोहोचते. अमिताभ बच्चन यांना स्टेजवर पाहून ती खूश होते. त्यानंतर त्या मुलीला बिग बी हे केबीसीच्या हॉट सीटपर्यंत कसे पोहचायचे? याबाबत माहिती देतात. '29 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता फक्त फोन उचला आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पाठवा. ', असं बिग बी म्हणतात. कौन बनेगा करोडपती-15 च्या प्रोमोनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.


कौन बनेगा करोडपती-15 च्या रजिस्ट्रेशनला 29 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या कार्यक्रमाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.


पाहा प्रोमो






केबीसीची सुरुवात 2000 साली झाली. या कार्यक्रमाचे 14 सीझन प्रेक्षकांच्या भेटीस आले. अमिताभ बच्चन यांनी या कार्यक्रमाच्या अनेक सीझनचे सूत्रसंचालन केलं आहे. या कार्यक्रमाची विविध सोशल मीडिया प्लॅटफॅार्मवर चर्चा होत असते. तसेच विविध बॉलिवूड सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमामध्ये हजेरी लावतात. 


अमिताभ बच्चन यांचे चित्रपट


केबीसी सारख्या कार्यक्रमांसोबतच बिग बी हे वेगवेगळ्या चित्रपटांमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येतात. काही दिवसांपूर्वी त्यांंचे ब्रह्मास्त्र आणि गुडबाय हे चित्रपट रिलीज झाले. तसेच अमिताभ बच्चन यांचा ऊंचाई हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या:


Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपती' चं सूत्रसंचालन करण्यासाठी बिग बी किती घेतात मानधन? जाणून घ्या...